गणरायाला भावपूर्ण निरोप

गणरायाला भावपूर्ण निरोप 

ढोल पथके शाळकरी मुलांचे मर्दानी खेळ, मानाच्या गणपतीसह मिरवणुकीत 14 गणपती मंडळांचा सहभाग 

नगर: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषणात नगरकरांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला काल शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाचे पुनरुत्थापन पूजन करण्यात आले. यावेळी गणपती मंदिराचे विश्वस्त आणि भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल गणपती मंदिरातील विनायकाची मूर्ती रथावर आरुढ झाल्यानंतर त्या ठिकाणी रुद्रनाथ व युगंधर ढोल पथकां च्या वादनाने वाजत गाजत गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली .विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील दारोदारी भाविकांनी रांगोळ्या काढून गणरायाचे स्वागत केले आणि आरत्या करून बाप्पाला पुढच्या वर्षी परत येण्याचे साकडे घालून निरोप दिला.


तेलीखुंटापासून चौपाटी कारंजा या विसर्जन मार्गावर रंग संस्कृतीच्या कलाकारांनी पूर्ण रस्ता भर गणरायाच्या स्वागतासाठी पाय गाड्यांची रंगीबेरंगी रांगोळी काढली सुरुवातीला 20 25 जणांचा या ताफ्यात समावेश होता मात्र चौपाटी कारंजा पर्यंत रांगोळी काढणे शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला रांगोळी काढण्याचे काम चालू असताना काही वाहनेही रांगोळ्यावरून जात असल्याने कलाकारांचा हिरमोड होत होता नंतर मात्र रांगोळीच्या बाजूने जाऊन वाहन चालकांनीही सामंजस दाखवले साधारण दुपारी साडेचार च्या दरम्यान मानाचा गणपती तेली खुंटावर आला रस्ता ठीक ठिकाणी प्रसादाचेही वाटप सुरू होते.


सायंकाळी पाचच्या सुमारास मानाचा गणपती कापड बाजारात असताना गणपती मिरवणुकीला उशीर होत असल्याचे लक्षात आले मात्र ढोल पथकांच्या वादनाने आणि शाळकरी मुला मुलींच्या मर्दानी खेळ पथकांचे अनेक ठिकाणी डाव रंगत असल्याने मिरवणुकीला उशीर होत असल्याचे लक्षात आले. 

मानाचा गणपती रात्री नऊच्या सुमारास चौपाटी कारंजा येथे आल्यानंतर गणपतीचे येथेही जोरदार स्वागत झाले या ठिकाणी युगंधर पथकातील कलाकारांनी धनगरी पोशाखात मशाल नृत्य सादर केले दहा वाजता दिल्ली दरवाजाजवळ असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या गणपती मंदिराजवळ मानाच्या गणपतीचे पूजन करण्यात आले आणि सव्वा दहा च्या दरम्यान मानाच्या गणपतीने दिल्ली दरवाजा बाहेर प्रस्थान ठेवले. 


यंदाच्या मिरवणुकीत मानाच्या 12 गणपती सह शहरातील 14 गणपती मंडळ सहभागी झाली होती. दोन मंडळांच्या मध्ये बरंच अंतर पडल्याने निवडणूक मध्यरात्री नंतरही सुरू होती मात्र पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवल्याने मिरवणुकीत अत्यंत उत्साहात मात्र शांततापूर्ण वातावरणात पार पडली. 

महानगरपालिकेच्या वतीने यंदा शहरातील 20 ठिकाणी घरगुती गणपती विसर्जनासाठी जलकुंबाची निर्मिती करण्यात आली होती त्यामुळे घरगुती गणपती विसर्जनासाठी एकाच ठिकाणी गर्दी न होता ठिकठिकाणी नागरिकांनी शांततेत गणेश विसर्जन केले. 

गणेशोत्सव शांततेत पार पडल्याने नगरकरांनी महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments