देवकृपा कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रयत्नांना यश
किरणताई बारस्कर-जनतेपर्यंत विकासाच्या योजना घेऊन जाण्याचे काम
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील देवकृपा कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या विकासकामामुळे देवकृपा कॉलनीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आणि नगरसेवक संपत बारस्कर यांच्या पाठपुराव्यातून प्रभाग क्रमांक १ मधील विकासाच्या योजना थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम सुरू आहे. प्रभागात नियोजनबद्ध व कायमस्वरूपी स्वरूपाची विकासकामे केली जात असल्यामुळे ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येत नाही. त्यामुळे विकासकामांच्या माध्यमातून प्रभागाची विकसित प्रभाग म्हणून ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन किरणताई संपत बारस्कर यांनी केले.
सर्वांना सोबत घेऊन टप्प्याटप्प्याने विकासाच्या योजना मार्गी लागत आहेत. त्यामुळे नागरिकही मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक १ मध्ये राहण्यास पसंती देत आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे किरणताई बारस्कर यांनी सांगितले.
नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने ही कामे मार्गी लागत आहेत. आमदार संग्राम जगताप आणि नगरसेवक संपत बारस्कर यांच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे.
प्रभागात झालेल्या विकासकामांचे अनुकरण शहरातील इतर प्रभागांतील नगरसेवक करतील, असा विश्वास डॉ. सागर बोरुडे यांनी व्यक्त केला.
देवकृपा कॉलनीतील नागरिकांनी रस्ता काँक्रिटीकरण कामाचे स्वागत करून नगरसेवकांचे आभार मानले. नगरसेवक संपत बारस्कर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचे नागरिकांनी कौतुक केले.
यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रवीण गाली, मनीलाल पटेल, शहाजी शिंदे, छबुराव फसले, शरद गुंड, सचिन सांगळे, प्रभाकर घोरपडे, कैलास निर्मळ, मनोहर कनोरे, जालिंदर गुंजाळ, संगीता देशमुख, शांता गुंजाळ, जया गुंड, मीनल निर्मळ, प्रियांका साळुंखे, मीना एके, सुरेखा कुंदे, सोनिया सांगळे, पूजा पटेल यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments