उपमुख्यमंत्री सुमित्रा ताई पवार यांचा अहिल्यानगर महापालिकेकडून सत्कार

  उपमुख्यमंत्री सुमित्रा ताई पवार यांचा अहिल्यानगर महापालिकेकडून  सत्कार



 महापौर ज्योतीताई गाडे : स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या विकासगतीला पुढे नेत शहरासाठी भरघोस निधी द्यावा 

अहिल्यानगर : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार यांच्या अहिल्यानगर दौऱ्यानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी महापौर ज्योतीताई गाडे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. त्या निधीमुळे शहरात अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामे मार्गी लागली असून नागरिकांना त्याचा मोठा लाभ झाला आहे.

अहिल्यानगर शहराचा झपाट्याने विस्तार होत असून पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच इतर विकासकामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीने शहराच्या विकासाला चालना दिली, त्याचप्रमाणे आपणही अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष सहकार्य करून भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा महापालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

.

यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, नगरसेविका संध्याताई पवार, बाळासाहेब पवार, संतोष ढाकणे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments