सोन लंपास करणाऱ्यांना तात्काळ अटक करा आणि .........

 सोन लंपास करणाऱ्यांना तात्काळ अटक करा आणि........


परप्रांतीय कामगारांच्या पोलीस व्हेरिफिकेशनची मोहीम हाती घेण्याची ठाकरे शिवसेनेची मागणी 

प्रतिनिधी : मध्यवर्ती शहरातील सराफ व्यावसायिकांची संगनमतातून संघटितरित्या लूट करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ६ परप्रांतीय कारागिरांनी ८ सराफ व्यवसायिकांच तब्बल १ कोटी रुपयांचं सोनं लंपास करून पोबारा केला. सोन लंपास करणाऱ्या या टोळीचा परदाफाश करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

या घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आरोपी फरार आहेत. काळे यांनी म्हटले आहे, अहिल्यानगर शहराला सराफ बाजाराची मोठी परंपरा आहे. शहरातील सराफ व्यवसायिकांकडे अनेक परप्रांतीय कामगार काम करतात. दागिन्यांची घडणावळ करणे विशेष कौशल्यावर आधारित काम आहे. त्यामुळे कुशल असणाऱ्या परप्रांतीय कामगारांना कामावर विश्वास ठेवून मोठी जोखीम व्यवसायिकांना पत्करावी लागते. 

निवेदनात म्हटले आहे, या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांचं प्रचंड मोठ आर्थिक नुकसान झालं आहे. शहरात अन्य व्यावसायिकांकडे देखील परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर काम करत असताना पाहायला मिळते. आधी विश्वास संपादन करायचा. नंतर मालकाचा विश्वासघात करत फसवणूक, चोरी करून हे परप्रांतीय कामगार पोबारा करतात. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. 

व्हेरिफिकेशनची विशेष मोहीम पोलिसांनी हाती घ्यावी : 

किरण काळे म्हणावे, अशा घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील सर्व परप्रांतीय कामगारांचे तात्काळ पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची विशेष मोहीम पोलिसांनी हाती घ्यावी. व्यापारी बांधवांनी देखील अशा कामगारांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांचे व्हेरिफिकेशन करून घेण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे. ज्या परप्रांतीय कामगारांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांची नावे, छायाचित्र यांची माहिती पोलिसांनी सार्वजनिक करावीत. जेणेकरून अशा कामगारां पासून व्यावसायिक सावध राहतील. याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या शहरातील सर्व पोलीस निरीक्षकांना सूचना करण्याची मागणी काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments