आ.शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मित निधन
नगर : राहुरी - नगर मतदार संघाचे आ. शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी आकस्मित निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ६७ वर्षांचे होते . सामान्य कार्यकर्ता ते माजी मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते .
काळ दिवसभर विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. मात्र आज पहाटे त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तपासणी नंतर त्यांचे सकाळी ८.१० मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यांच्या जाण्याने बुऱ्हाणनगर परिसर ,नगर तालुका, शहर परिसर शोकसागरात बुडाला आहे.
सर्वसामान्य कार्यकर्ता ,सरपंच ,आमदार ,आणि मंत्रीपदापर्यंत त्यांनी वाटचाल केली.
.jpg)
0 Comments