शिकण्याची संधी सोडू नका ज्ञानाने भविष्य घडेल

  शिकण्याची संधी सोडू नका ज्ञानाने भविष्य घडेल

 ॲड.  किशोर देशपांडे  -   भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये ६८ वे   वार्षिक पारितोषिक वितरण                                                                
वेब टीम नगरदि. १२ - दिवस भर कष्ट करून ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच शिकण्याची इच्छाआहे.अश्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी भाईसथ्था नाईट हायस्कूलने उपलब्ध करून दिलीआहे.वर्गात मिळालेले मार्क आणि आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचा काहीही संबंध नाही.अनुभवाने जे ज्ञान मिळते ते पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे.मोठ्या माणसांबरोबर राहून माणूस मोठा होत नाही तर चांगल्या माणसांबरोबर राहून माणूस नक्कीच मोठा होतो.जगण्यासाठी पैसे पुरेसा नाही शिक्षणाची जिद्द ठेवा व मनाशी खूणगाठ बांधून शिक्षणात प्रगती करा व यश मिळवा.रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी शिकण्याची संधी सोडू नका ज्ञानाने भविष्य घडेल.असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ  ॲड किशोर देशपांडे यांनी केले.

   हिंदसेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज,भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये ६८वे स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात सम्पन्न झाले.याप्रसंगी प्रसिद्ध विधिज्ञ  ॲड किशोर देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,नगरसेविका सोनालीताई चितळे, कार्याध्यक्ष अजित बोरा,माजी मानद सचिव सुनील रामदासी,सचिव संजय जोशी,माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा,कैलास उडपीचे दामोधर भोसले,सुजित बेडेकर,उपकार्याध्यक्ष तथा चेअरमन डॉ. पारस कोठारी,उपाध्यक्षअनंत पाठक,रमेश झरकर,विष्णूशेठ सारडा,बाबूशेठ बोरा, ॲड . सुभाष काकडे , ॲड.  सौरभ काकडे,सचिन मुळे,सहायक सचिव बी.यु कुलकर्णी,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे,विठ्ठल उरमुडे,आजीव सभासद सौ ज्योतीताई कुलकर्णी,अजित रेखी,सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अमरजा रेखी,शालेय समिती सदस्य अलकाताई मुळे,इनायत उल्लाखान,जन शिक्षण संस्थेचे पवार सर,प्रा.संजय धोपावकर,प्रा.संजय साठे,प्रा.साईनाथ थोरात,मासूमचे प्रतिनिधी अशोक चिंधे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल,प्राचार्य सुनिल सुसरे,शिक्षक प्रतिनिधी अमोल कदम,शिक्षकेतर प्रतिनिधी कैलास बालटे,विद्यार्थी प्रतिनिधी सिमरन शेख,अंजली मोहिते,अभिषेक भागडे,सचिन पाटील आदी उपस्थित होते.                                                                                               

प्रा.शिरीष मोडक म्हणाले कि,आदर्श हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार व क्रिकेट खेळाडू झहीर खान यांना पदमश्री मानाचा पुरस्कार मिळाला हे हिंद सेवा मंडळाचे विद्यार्थी आहेत.हि हिंद सेवा मंडळासाठी अभिमानास्पद बाबआहे.विद्यार्थ्यांनी त्यांचाआदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती करावी.                                                       

नगरसेविका सोनालीताई चितळे म्हणाल्या कि,नाईट स्कुलने विद्यार्थ्यांना यश मिळवण्याची संधी  उपलब्ध करून दिली हि भाग्याची गोष्टआहे. येथील विद्यार्थी खेलो इंडिया सारख्या स्पर्धेत यश मिळवितात हि कौतुकास्पद बाब आहे.      सुनील रामदासी म्हणाले कि,शाळेच्या अहवालात विद्यार्थ्यांचे नाव येणे हि भाग्याची बाबआहे.कष्टाशिवाय पर्याय नाही हे रात्र प्रशाळेतील विद्यार्थी जाणतात.आपल्या आयुष्याचे भविष्य जो कष्टाच्या शाईने लिहितो तोच खरा जीवनात यशस्वी होतो.                                                                   

ब्रिजलाल सारडा म्हणाले कि,कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे कर्म करा यश निशिच्त मिळेल.सुशीलकुमार शिंदे हे रात्र शाळेत शिक्षण घेऊन मुख्यमंत्री,गृहमंत्री असा बहुमान मिळवला  आहे.जीवनात यशस्वी होण्यासाठीअश्या व्यक्तींचा आदर्श घ्यावा.                                           

   कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.   प्रास्तविकात चेअरमन डॉ.पारस कोठारी म्हणाले कि,भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.मुंबई येथील मासूम संस्थेच्या संचालिका  निकिता केतकर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी फिरती प्रयोग शाळा,अल्पोपहार,१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित,वाचनालय अनेक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यातआले.रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करावेत यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.                                                                                                     

प्राचार्य सुनील सुसरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.                                                               

  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक देवीदास खामकर,गजेंद्र गाडगीळ,महादेव राऊत,संदेश पिपाडा,प्रशांत शिंदे,अशोक शिंदे,करांडे ,गोर्डे ,शिवप्रसाद शिंदे,अनिरुद्ध देशमुख,सुजय रामदासी,अविनाश गवळी,मनोज कोंढेजकर,वैशाली दुराफे, साठे ,भोसले , साताळकर ,जाधोर  आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.                                                         

सूत्रसंचालन  वाणी  ,प्रा.शरद पवार,प्रा मंगेश भुते यांनी केले तरआभारअमोल कदम यांनी मानले . 

Post a Comment

0 Comments