निंबळक येथे  श्रीक्षेत्र धरमपुरीत गजानन महाराज प्रकटदिन

    वेब टीम  नगर,दि. १२ - नगर तालुक्यातील निंबळक येथील श्रीक्षेत्र धरमपुरी येथे श्री संत गजानन महाराज (शेगांव) प्रकटदिन सोहळा साजरा होत आहे. बुधवार दि.१२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ८. ३० ते १२ पर्यंत गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण  होणार आहे. व्यासपीठचालक गावडेताई असतील.

     दि.१५ फेब्रुवारी प्रकट दिनी पहाटे ५ ते ७ श्रींचे मंगल स्नान व लघुरुद्र, स७ते ९ अभिषेक, आरती, स. ९ ते ११ गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार, दु.११ ते १२ दिंडी, श्रींची पालखी मिरवणुक, दु.१२ वा. महाआरती, दु. १२ ते ३ भजन व महाप्रसाद, दु. ३ ते ५ श्रीनिवास महाराज घुगे यांचे किर्तन, ४ ते ६ बाळकृष्ण महाराज खेसे यांचे प्रवचन, सायं. ६ते ७ महाआरती, महाप्रसाद, रात्री १० ते १०.३०शेज आरती होईल.
     तरी या धार्मिक उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments