नाट्य समीक्षण
'प्रियंका आणि दोन चोर' 'सामाजिक दरी', वर भाष्य करणारं नाटक
नगर : 63 व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी श्री स्व. गिरिधारीलाल चौधरी अभिनव ग्राम प्रबोधिनी अहिल्यानगर या संस्थेचे 'प्रियंका आणि दोन चोर' हे नाटक सादर झाले. श्याम मनोहर लिखित या संहितेचे दिग्दर्शक कृष्णा वाळके यांनी केले होते.
पडदा उघडतो आणि रंगमंचावर बांधकाम सुरू असलेली एक इमारत नजरेस पडते . बाहेरच पडलेली वाळू विटांचा ढिगारा, सुटाबुटातला एक तरुण प्रवेशतो आणि बॅगेतून एक ट्रांजिस्टर काढून त्यात वाजणाऱ्या गाण्यावर ठेका धरतो. इतक्यात तिथे प्रियंका येते . ट्रांजिस्टर वर वाजणारे गाणे ऐकून आनंदित होते. इतक्यात दुसरा तरुण तिथे काहीशा विमनस्क अवस्थेत येतो. मला चेन मिळाली नाही असं पुटपुटत हताशपणे बसतो प्रियंका जाते.
पहिला तरुण दुसऱ्या तरुणांशी संवाद साधताना आपण पेहराव बदलला त्याचा आपल्याला फायदाच झाला. आता आपल्याकडे लोक चोर म्हणून बघत नाहीत. याचे समाधान त्या दोघांच्या संवादातून स्पष्ट होते. तसेही आपण प्रियंकाला खरी नावे सांगितलेली नाहीत ,त्यामुळे तिला काहीच पत्ता लागणार नाही . याबद्दल समाधान व्यक्त करून पहिला तरुण दुसऱ्या तरुणाला चा गौरव असा उल्लेख करतो तर दुसरा तरुण पहिल्या तरुणाला अभिषेक म्हणून हाक मारून चला आपण निवांत काहीतरी करूया असे म्हणतो. तेव्हा अभिषेक त्याला म्हणतो की मी दारूची बाटली आणली आहे आपण दारू पिऊ आणि गरम गरम बिर्याणी खाऊ. . दारू प्यायला सुरुवात करणार इतक्यात तिचे प्रियंका येते. आज मी खूप खुश आहे कारण मी आठवडाभराचा किराणा भरून ठेवला आहे. आणि हो तुम्ही इथे एक आठवडा तरी रहा तसे मी फक्त पन्नास रुपये भाडे घेईन, तिघात बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी होतात त्यातून अभिषेक आणि गौरव हे दोघेही चोर असतात आणि प्रियंका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वाचनाची बायको असते आणि तीही जमेल तसे वाळू विटा चोरून विकत असते आणि इतर महिलांकडे घरकाम करत असतेच असून मिळणाऱ्या पैशातून ते आपल्या संसाराची स्वप्न रंगवत असते. प्रियंकाला एक छोटे बाळ ही आहे. त्याला शिकवून खूप मोठा करायचा आहे. शिवाय घरात रंगीत टीव्हीही घ्यायचा आहे.
गौरवला चेन मिळत नाही म्हणून तो हताश असतो तर अभिषेकला दारू प्यायला मिळत नाही म्हणून तो विमनस्क अवस्थेत पोहोचतो. प्रियांकावर रेप करण्याचा विचारही ते दोघे करतात इतक्यात तिथे प्रियंका येते. आज गावाहून माझी आई आणि बहीण आलेली आहे त्यामुळे आठवडाभरच्या किराण्याचा एका दिवसात फडशा पडणार याची तिला चिंता लागून असते.
अभिषेक एक दिवस गौरवला सोन्याची चैन देतो तसं गौरवलाही खूप आनंद होतो. अशीच ठसठशी चैन मला हवी होती. तर अभिषेकला पुन्हा दारू पिण्याची इच्छा होते. अभिषेक आणि गौरव पुन्हा इच्छा झाल्याच्या आनंदात असतात. तशी प्रियंका तिथे येते, आज मला झोपच येत नाही. बहुतेक झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतील, असे म्हणून घरी जाऊन झोपेच्या गोळ्या घेऊन झोपते. तिचे मूल रडत असते इतक्यात एका बाईचा आवाज येतो प्रियांका उठ बाळ रडते आहे. प्रियंका उठ, तसा अभिषेक आणि गौरव प्रियंका ने बहुतेक झोपेच्या गोळ्या जास्तच घेतल्या आहेत. तिला डॉक्टरांकडे न्यायला हवे. तसे गौरव त्याला म्हणतो हा प्रियंकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यात पडायला नको. तर अभिषेक त्याला म्हणतो की नाही आता तरी आपण चांगला वागायला पाहिजे . तर अभिषेक गौरवला म्हणतो आता चांगले वागण्याची सुद्धा भीती वाटायला लागली आहे . बाळाचा रडण्याचा आवाज वाढत जातो पडदा पडतो . असा सामाजिक दरी वर भाष्य करणारी हि संहिता.
श्याम मनोहर लिखित आणि कृष्णा वाळके दिग्दर्शित या नाटकात लेखकाने लिहिलेल्या संहितेचा अपेक्षीत संदेश दिग्दर्शक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही असं. संपूर्ण असे संपूर्ण प्रयोगभर जाणवत राहिले. नाटकाच्या तांत्रिक बाजू म्हणजेच नेपथ्य (हर्षदा पगारे) पार्श्वसंगीत (राकेश इंगवले) प्रकाश योजना (तुषार बोरुडे) वेशभूषा (भारत पवार) रंगभूषा (प्रेरणा मोहिते) या सगळ्या बाजू सशक्त होत्या. काही प्रसंगात प्रकाश योजनेच्या माध्यमातून आणखी उठावदारपणा आणता येऊ शकला असता. मात्र तरीही नाट्य प्रयोग प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचू शकला नाही. या नाटकातील पात्र तरुण एक (कृष्णा वाळके )तरुण दोन (प्रतिकं अंदुरे) प्रियंका (रेणुका ठोकळे) यांनी आपापल्या भूमिका नीटश्या निभावल्या., मात्र तरीही नाटकाचा अपेक्षित संदेश प्रेक्षकांत पर्यंत पोहोचू शकला नाही.
0 Comments