निरंकारी मिशनचा ७७ वा वार्षिक संत समागम १६ पासून

निरंकारी मिशनचा ७७ वा वार्षिक संत समागम १६ पासून

नगरशहरासह जिल्ह्यातून हजारो निरंकारी भक्त उपस्थित राहणार

नगर-   सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या पावन छत्रछायेखाली निरंकारी मिशनच्या वतीने तीन दिवसीय ७७ वा वार्षिक निरंकारी संत समागमचे भव्य आयोजन  आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे दि. १६ ते १८ नोव्हेंबर पर्यंत होणार असून संत समागमाला नगर शहर सह जिल्ह्यातून तसेच अहमदनगर क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या शाखा बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, आदी ठिकाणाहून हजारो निरंकारी भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाचे नगर क्षेत्र प्रमुख हरीश खूबचंदानी यांनी दिली.

      निरंकारी संत समागम मानवतेचा असा एक दिव्य संगम असतो जेथे ज्ञान, प्रेम आणि भक्तीचा अनुपम दृश्य पहायला मिळते.धर्म, जात, भाषा, प्रांत तसेच गरीब- श्रीमंत, उच्च- नीच आदी बंधनाच्या पलीकडे जाऊन विश्वबंधुत्वाचा साकार चित्र प्रत्यक्षात अनुभवता येईल. यंदाचा समागमाचा विषय 'विस्तार, अनंताच्या दिशेने' असा असून तीन दिवस गीत, विचार, कविता आदी माध्यमातून भक्तगण भक्तीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकतील. सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रवचनरूपी अमूल्य उपहाराची तसेच भव्य दर्शनाचा भाविक लाभ प्राप्त करतील.

       या भव्य दिव्य आयोजनामध्ये देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक- भक्तगण सहभागी होतील. परदेशातून ही मोठ्या संख्येने निरंकारी अनुयायी उपस्थित राहतील. समागम परिसर भव्य रूपात सजविण्यात आला असून विशाल सत्संग पंडाल मध्ये सर्वांची बसण्याची उचित व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिसरात एलईडी स्क्रीन लावण्यात येत आहेत. शेकडो एकर वरील मैदानांवर आयोजित समागम परिसराला ए,बी, सी, डी, ग्राउंड अशा चार भागांमध्ये विभाजन केले असून ए ग्राउंड मध्ये मुख्य सत्संग समारोह, निरंकारी प्रदर्शनी, प्रकाशन, कॅन्टीन, लंगर, पार्किंग, कार्यालये असतील, इतर तीन ग्राउंड मध्ये भाविक भक्तांच्या राहण्याची व्यवस्था निवासी तंबूत करण्यात आली असून सोबत आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. 

समागम मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला कोणत्याही प्रकारची   असुविधा होऊ नये अशी व्यवस्था प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जात असून यात निरंकारी सेवा दलाचे हजारो महिला पुरुष सदस्य योगदान देत आहेत. मुंबईच्या गोपी अँड पार्टी टीम कडून संपूर्ण परिसरात व भव्य मुख्य प्रवेशद्वार उभारला जात आहे. एकंदरीत समालखाच्या आध्यात्मिक स्थळी 'भक्ती नगरीचे' रूप धारण होत आहे.

       तरी प्रेम, सदभाव आणि एकत्वाचा दिव्य संदेश प्रदर्शित होणाऱ्या मानवतेच्या या महासमागमा मध्ये समस्त बंधू भगिनी भाविक सादर आमंत्रित आहेत. 

Post a Comment

0 Comments