निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,राहुरी विभाग, अहिल्यानगर यांची मोठी कारवाई

  विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,राहुरी विभाग, अहिल्यानगर यांची मोठी कारवाई

 

नगर :  राज्य उत्पादन शुल्क, राहुरी-1, राहुरी-2 व राहुरी-3 यांच्या समवेत विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आदर्श आचार संहिता कालावधीमध्ये गुन्हा अन्वेषण मोहिमेत अवैध देशी-विदेशी मद्य विक्री ठिकाणांवर तसेच, राहुरी, पारनेर ता.जि. अहिल्यानगर येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभागाचे निरीक्षक श्री. चंद्रकांत सिताराम रासकर यांनी दिली. 

सदर कारवाई मध्ये एकूण ३ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ५.७६ ब. ली. देशी दारू, २५० लिटर रसायन व ४० लिटर हातभट्टी गावठी दारू जागीच नाश करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रु.16,890/- (सोळा हजार आठशे नव्वद रुपये) इतकी आहे. 

सदर कारवाईत एकूण ३ आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सदरील कारवाई श्री. सागर धोमकर विभागीय उपआयुक्त रा. उ. शु. पुणे विभाग पुणे, श्री. प्रमोद सोनोने,

अधीक्षक, रा.उ.शु अहिल्यानगर, श्री. प्रवीण कुमार तेली, उपअधीक्षक, रा.उ.शु अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखालीश्री. चंद्रकांत सिताराम रासकर, निरीक्षक, राहुरी-विभाग, दुय्यम निरीक्षक शितलकुमार पाटील, दुय्यम निरीक्षक श्री.एम. बी. साळवे, स.दु.नि. एस. बी. विधाटे, सर्वश्री जवान निलेश बुरा, सचिन गुंजाळ, दिलीप पवार, अंकुश कांबळे,जिया पठाण यांनी सहभाग घेतला आहे.

 यापुढे देखील अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री. चंद्रकांत सिताराम रासकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, राहुरी- विभाग, अहिल्यानगर यांनी अशी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments