एसएससी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
सुनील गाडगे - शिक्षक भरतीच्या प्रयत्नांना यश
मुंबई- इयत्ता 10 वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असणार्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत 5 नोव्हेंबर 2024 देण्यात आली होती. मात्र वेबसाईट वर येणार्या तांत्रिक अडचणी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना आलेल्या निवडणुक ड्यूटी आणि प्रशिक्षण तसेच दिवाळी सुट्ट्या लक्षात घेता 5 नोव्हेंबर 2024 ही फॉर्म भरण्याची मुदत पर्याप्त होणार नसल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे तसेच सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.
या मागणीची दखल घेत दिनांक 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिली.
साधारण 26 ऑक्टोबर ते 10नोव्हेंबर 2024 या कालावधीत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना दिवाळी सणानिमित्त सुट्टी आहे. काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दिवाळी सणानिमित्त आपल्या मूळगावी जातील. तरी दिवाळीच्या सुट्टया संपल्यानंतर म्हणजेच 12 नोव्हेंबर 2024 नंतर पुढील किमान 7 दिवसांपर्यंत (20 नोव्हेंबर पर्यंत) इयत्ता 10 वी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी शिक्षक नेते तथा शिक्षक भरतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी केली आहे.
जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, कैलास जाधव, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, , सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, सोमनाथ बोंतले, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या राज्यअध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी करून या मागणीसाठी विशेष पाठपुरा केल्यामुळेच या मागणीला यश आले आणि एसएससी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली.
0 Comments