एस के क्रिकेट अकॅडमीने बाल वयातच चांगले क्रिकेटर निर्माण केले
सम्राट देशमुख : एस के क्रिकेट अकॅडमी व अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक डब्ल्यू एपीएल स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न.
नगर : शालेय शिक्षणाबरोबर खेळालाही तितकेच महत्त्व आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळामध्ये जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे. एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मुलींसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील सुमारे 70 मुली सहभागी होऊन क्रिकेट खेळाचे चांगले प्रदर्शन केले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो, एस के क्रिकेट अकॅडमीने बाल वयातच चांगले क्रिकेटर निर्माण केले. असे प्रतिपादन सम्राट देशमुख यांनी केले.
एस के क्रिकेट अकॅडमी व अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक डब्ल्यू एपीएल स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी सम्राट देशमुख, अजय कविटकर, महेश गलांडे, रवींद्र बोडके, एस के क्रिकेट अकॅडमी चे प्रशिक्षक संदीप आडोळे आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप आडोळे म्हणाले की, एस के क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने मुलींसाठी आमदार चषक डब्ल्यू ए पी एल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना संघर्ष प्रतिष्ठान व गॅलेक्सी नॅशनल स्कूल मध्ये झाला असून, संघर्ष प्रतिष्ठान विजेता ठरला आहे.
या स्पर्धेतील बेस्ट बॉलर साक्षी सागर, बेस्ट बॅटमॅन अंबिका वताडे, बेस्ट फिल्डर संस्कृती घोरताले यांना सन्मानित करण्यात आले, तसेच वूमन ऑफ द सिरीज पायल चव्हाण हिला सायकल देऊन सन्मान करण्यात आला. असे ते म्हणाले.
0 Comments