।। जागर शक्तीचा ।। जागर भक्तीचा ।।
सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे श्रद्धास्थान "श्री कालिका माता"
सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे आराध्य दैवत श्री कालिका माता होय.श्री कालिका माता कासार समाजाच्या श्री कालिका देवी मंदिरात कशी स्थापन झाली याचा एक इतिहास आहे.आज असलेली श्री कालिकामाता देवीची मूर्ती फार पुरातन आहे, ही मूर्ती नगरच्या नालेगाव भागात एका झाडाखाली मारुती मंदिरापुढे होती.या मूर्तीवर तेलाचे किटण मोठ्या प्रमाणावर साठलेले होते शनिदेवाचीही मूर्ती समजून लोक तेल मूर्तीला वाहत असत त्यामुळे मूर्तीस तेलाचे किटण चढले होते.कै.शंकरराव देवळालकर यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला.मला तुमच्याकडे (समाजाकडे) घेऊन जाऊन माझी स्थापना करा त्यानुसार कै.शंकरराव देवळालकर समाजातील प्रमुख व्यक्तींकडे आणि नालेगावातल्या पाटलांकडे गेले सदरची मूर्ती पाटलांकडून घेतली आणि त्या मूर्तीचे सत्यरूप पाहण्यासाठी स्वच्छ करण्यास तांबटाकडे दिली.गरमपाणी व सोडा याच्या साह्याने या मूर्तीचे किटण काढण्यात आले. मूर्तीचे सुंदर स्वरूप दिसतात ती मूर्ती आपल्याकडे ठेवावी असा मोह त्या तांबटाला झाला तात्काळ त्या तांबटाची तब्येत बिघडली जुलाब , वांत्या सुरू झाल्याने या तांबटाने ही मूर्ती कासार समाजाच्या स्वाधीन केली.
श्री कालिका मातेच्या मूर्तीची स्थापना या इमारतीमध्ये फाल्गुन शुक्ल तृतीया शके १८५७ मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी १९३६ रोजी दुपारी अकरा वाजता विधीपूर्वक यथासांग करण्यात आली.
यानंतर मंदिरात नवरात्र महोत्सव, मंगळवारी धार्मिक भजन, चैत्र उटीचा, महिला मंडळाचे सामुदायिक मकर संक्रांत व चैत्र हळदीकुंकू, कोजागिरी पौर्णिमा असे कार्यक्रम होतात. कासार समाजाचे व नगर वासियांचे श्री कालिकामाता मंदिर हे एक श्रद्धास्थान आहे.
सन १९५५ साली श्री नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी यथासांग शास्त्रोक्त धार्मिक पद्धतीचा अवलंब करावा यासाठी श्री कालिका यै नमः या मंत्राचा सव्वा कोटी नाम जप करून महोत्सवास सुरुवात करण्यात आली. सन १९५८ पासून श्री कालिकामातेस दररोज बदलती वाहनं करण्यात येऊ लागली ही परंपरा आजही चालू आहे. धनंजय वेळापुरे वाहन तयार करतात वाहनांमध्ये गजराज, अश्व, कमळ, नंदी, सिंह, मयुर, दैत्य वध , गरुड, हंस आणि दसऱ्याला अश्व रथ आणि कोजागिरीला हरीण अशी वाहने करतात. तसेच नवरात्र महोत्सव काळात होम, भंडारा ,तसेच समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार, महिला व मुलांचे विविध कलागुणांचे कार्यक्रम घेतले जातात.आजही फाल्गुन शुक्ल तृतीयेला श्री कालिका देवी मूर्ती प्रतिष्ठापना व वर्धापन दिन साजरा केला जातो व कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो.
0 Comments