महिलां सरपंचाची बदनामी करणाऱ्या सुरेश बहिलम यांच्यावर कारवाई करा

 महिलां सरपंचाची बदनामी करणाऱ्या सुरेश बहिलम यांच्यावर कारवाई करा

जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे महिला सरपंचाची मागणी

नगर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावची सरपंच मीनाक्षी रामदास सकट गेल्या ५ वर्षांपूर्वी लहुजी संघर्ष सेना ह्या सामाजिक संघटनेमध्ये महिला अध्यक्ष म्हणून काम करत होते. तसेच अनेक वर्षा पासून सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात होते ह्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बहिलम हे इतर लोकांच्या फोन वरून रात्री अपरात्री फोन करून सांगायचे कि दुसऱ्या दिवशी इतर जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या विश्रामगृहाला मीटिंग आहे असं सांगून मला तिथं बोलवायचे आणि सांगयचे कि महिलांची निवड करायची आहे आणि तुम्हाला यावच लागेल. असं सांगून ते मला विश्रामगृहावर बोलवायचे आणि तेथे गेल्या नंतर कार्यकर्त्यांना न बोलवता फक्त त्यांच्या जवळच्या दोन-तीन कार्यकर्तेनाचं बोलवत होते. अनेक वेळा फोन करत रेकॉर्डिंग करून ठेवायचे आणि त्याच रेकॉर्डिंग ते मला सेंड करायचे त्या माध्यमातून त्यांनी मला ब्लॅकमेलिंग सुरू केली त्यांच्या अशा वागणुकीमुळे मी त्या संघटनेचा राजीनामा दिला माझ्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी संघटनेचा राजीनामा दिला ह्या गोष्टीचा सुरेश बहिलम यांना खूप राग आला,

 त्यानंतर त्यांनी एक मेसेज मला टाईप करून पाठवला की मी तुझी पूर्णपणे बदनामी करून, तुला तोंड दाखवला जागा ठेवणार नाही. तु आमच्या नादाला लागु नको, तू पुन्हा आमच्या संघटनेत ये नाहीतर आम्ही तुझं जगणं मुश्किल करू, आणि  त्यांनी माझ्या घरामध्ये वाद निर्माण व्हावा माझ्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला. आणि माझी बदनामी करायला सुरुवात केली, रेकॉर्डिंग मध्ये माझा कोणताही वाईट शब्द नाही तरी पण त्यांनी माझी बदनामी सुरू केली आणि त्या माध्यमातून त्यांनी मला "तू" परत आमच्या संघटनेत ये नाही आली तर तुझी आम्ही जास्त बदनामी करू, अशी धमकी दिली. पाठवलेली रेकॉर्डिंग तसेच पाठवलेले मेसेज माझ्याजवळ सर्व पुरावे म्हणून मी जपून ठेवलेले आहे कारण, त्यात माझे कोणताही वाईट नाही ये माझी फक्त एक फसवनुक करण्यासाठी त्यांनी हे चालवलेले आहे. पोलीस प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे कि आज मी एक सक्षम महिला आहे म्हणून मी याचा पाठपुरावा करत आहे माझ्या जागेवर दुसरी महिला असती तर तिने आत्महत्या चे पाऊल उचले असते या पुढे कोणत्याही महिलांवर वाईट वेळ येऊ नये, आणि अश्या दलिंदर लोकांवर वर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कडे निवेदनाद्वारे केली

          श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे सुरेश बहिलम व स्वप्निल सपकाळे यांच्यावर गुन्हा दाखल असून तातडीने कारवाई करावी अन्यथा मी व माझ्या कुटुंबियांचे बरे वाईट झाल्यास सुरेश बहिलम व स्वप्निल सपकाळे आणि जिल्हा पोलीस प्रशासन जवाबदार राहील. आज माझे कुटुंब माझ्याबरोबर असून मला पाठिंबा देत आहे असे सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांनी निवेदनात म्हटले आहे

        या वेळी पती रामदास सकट म्हणाले कि यात माझ्या पत्नीचा काहीच दोष नाही पण ज्यांनी हे कृत्य करून बदनामी केली त्यांच्यावर लवकर कारवाई करवी वेळ पडल्यास माझ्या पत्नीच्या न्यायासाठी लढा उभरणार, गरज पडल्यास आत्मदहन करील असे ते म्हणाले. 

Post a Comment

0 Comments