केमिस्ट चॅम्पियनशिप लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

केमिस्ट चॅम्पियनशिप लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

वाडीयापार्क येथे ९मे ते१५ मे फ्लड लाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

वेब टीम नगर :  केमिस्ट परिवाराचे अशोक रेणूगोंटला यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क येथे आयोजित केमिस्ट चॅम्पियनशिप लीग २०२२ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ९ मे ते १५ मे पर्यंत संपन्न होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन मा.आ.अरुणकाका जगताप,आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नरेंद्र फिरोदिया उपस्थित राहणार आहे.मुख्य प्रायोजक सिद्धी ग्रुप स्काय ब्रीज चे संचालक मनोज छाजेड, मुकेश छाजेड सहप्रायोजक श्री दीप हॉस्पिटल चे संचालक डॉ.अमित बडवे व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकत्र येण्यासाठी कमिटीतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉक्टर्स, केमिस्ट व एम. आर.सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे सर्व सामने नाईटला होणार आहे  नगरकरांनी या क्रिकेट स्पर्धेचा पाहण्याचा आनंद घ्यावा अशी माहिती केमिस्ट असोशियन चे अध्यक्ष दत्ता गाडळकर, विशाल शेटीया, मनीष सोमानी, संदीप कोकाटे, रुपेश भंडारी व प्रशांत पाटील, मनोज खेडकर, ओम गुंडू, अभिजीत जाधव, अभिजीत गांगर्डे, राहुल जाधव, रीनुल गवळी, सौरभ झालानी, तुषार काळे, कमलेश गुंदेचा, वैभव वाघ, श्रीनिवास बोडखे, अमित गोयल, किरण रासकर, अविनाश काळे, भूपेंद्र खेडकर यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments