विपुल ग्रंथसंपदेतून व्यक्तिमत्व विकासाची अमूल्य संधी
प्रा शिरीष मोडक : अ नगर जिल्हा वाचनालय डॉ. ए.पी.जे.कलाम वाचन प्रेरणा दिनी बालकांना वाचनालयाचे मोफत सदस्यत्व
नगर- आपल्याला स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ऐतिहासिक अ.नगर जिल्हा वाचनालयाची सव्वा लाख अमूल्य ग्रंथांची विपुल संपदा उपलब्ध आहे. आपल्या साठी असलेल्या या वाचनालयातील असंख्य ग्रंथ संपदेच्या संधीचा फायदा घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास घडवावा,असे प्रतिपादन अ नगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी व्यक्त केले.
अ नगर जिल्हा वाचनालयात मा.राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. कलाम वचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रम प्रसंगी अ.ए.सो.च्या बाई इचरचबाई फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा.मोडक बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष दिलीप पांढरे, संचालक प्रा. ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, मुख्याध्यापिका ज्योती सिसोदिया, शकुंतला देसारडा, वैभव वाघ, ग्रंथपाल अमोल इथापे, सहग्रंथपाल नितीन भारतात, पल्लवी कुक्कडवाल, उपस्थित होते.
यावेळी वाचनालयाच्या वतीने उपस्थित 50 विद्यार्थ्यांना अ नगर वाचनालय बाल विभागाचे मोफत सदस्यत्व देण्यात आले असल्याचे संचालिका शिल्पा रसाळ यांनी जाहीर केले. प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी उपस्थिताना वाचन संस्कृती ,समृद्धीची , व ती वृध्दींगत करण्याची शपथ दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विविध प्रेरणादायी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.उपस्थित सर्व विद्यार्थी ,शिक्षक यांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ. ज्योती सिसोदिया यांनी जिल्हा वाचनालयाचे आयोजित या वाचन प्रेरणा दिनामुळे भविष्यातील समृद्ध, संस्कारीत पिढी घडण्यास चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला. आभार ग्रंथपाल अमोल इथापे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.वर्षा जोशी, संकेत फाटक, निखिल ढाकणे तसेच वाचक आणि कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments