भुईकोट किल्ला व जॉगिंग ट्रॅक सुशोभिकरण व दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांना साकडे
नगर - भुईकोट किल्ला अहिल्यानगर या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन किल्ला परिसर आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली असता यावेळी जेष्ठ नागरीक व फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने भुईकोट किल्ला परिसर व जॉगिंग ट्रॅक दुरुस्तीच्या कामासाठी समक्ष चर्चा करुन निवेदनाव्दारे हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी साकडे घातले.
गेल्या चार वर्षांपासून किल्ला पसिरात फिरण्यासाठी येणार्या जेष्ठ नागरीक व उद्योजक, युवा वर्ग व पोलिस भरतीसाठी येणार्या युवक यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून आजपर्यंत देखलभाल व दुरुस्ती केली जात आहे. यासंदर्भात हि मा.जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी सकारात्मक भुमिका घेवुन लवकरच किल्ला परिसर व जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती व सुशोभिकरण तसेच अत्यावश्यक असलेल्या सुविधा देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
अनेक दिवसांपासून या परिसराची कोणीही दखल घेत नव्हते. परंतु येथील परिसरात व्यायाम व फिरण्यासाठी येणार्या लोकांकडूनच या परिसराची देखभाल व काही छोटे मोठे दुरुस्ती काम चालू होते. शौचालय, स्ट्रीटलाईट, रस्ता, सुरक्षारक्षक आदींसह अनेक सुविधासाठी मोठा निधी मिळाल्याशिवाय ते काम मार्गी लागणार नव्हते, त्यामुळे येथील फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या पुढाकाराने व जेष्ठ नागरीक, व्यापारी, उद्योजग, युवावर्ग यांच्या सहकार्याने हा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली असता, जिल्हाधिकारी सालीमठ यांनी भुईकोट किल्ला परिसरास प्रत्यक्ष भेट देऊन या परिसराची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलेल्या आश्वासनाचे सर्वांचे कौतुक केले. व काम लावकरात लावकर मार्गी लागणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले व जिल्ह्याधिकारी साहेब यांचे आभार मानले. यावेळी जेष्ठ पत्रकार व इतिहास तज्ञ भुषण देशमुख, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments