शिक्षकांच्या रजा कालावधीतील शिक्षण सेवकांचे मानधन दोन वर्षापासून रखडले : सुनिल गाडगे

शिक्षकांच्या रजा कालावधीतील शिक्षण सेवकांचे मानधन दोन वर्षापासून रखडले : सुनिल गाडगे

नगर : गेल्या दोन वर्षापासून माध्यमिक शाळांमधील शिक्षक रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागेवर नेमलेल्या शिक्षण सेवकांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. ते तात्काळ मिळावे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनिल गाडगे यांनी सांगितले.

पुण्यात शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांची शिक्षक नेते सुनिल गाडगे व पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणुन दिले की, शिक्षकांच्या रजा कालावधीत नेमलेल्या शिक्षण सेवकांचे मानधन दोन वर्षापासून प्रलबिंत आहेत. ते तातडीने जमा करावेत, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, अशा इशारा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने देण्यात आला.

यावेळी शिक्षक नेते सुनिल गाडगे म्हणाले, महागाईच्या काळात दिवस न परवडणारे आहेत, अशातच रजा कलावधीत काम केलेल्या शिक्षण सेवकांचे दोनवर्षांपासून रखडलेले मानधन अद्यापही न दिल्याने त्यांना अनेक आर्थिक परिस्थितींना सामोरे जावे लागत आहे. दोन दोन वर्ष मानधन मिळत नसल्याने शिक्षकांच्या रजा कालावधीतील जागेवर शिक्षण सेवक काम करण्यास तयार नसतात, यासाठी तातडीने रजा कालवधीतील नेमलेल्या शिक्षण सेवकांच्या खात्यावर मानधन जमा करावे, असे ते म्हणाले.

यावेळी शिक्षक भारती संघटनेच्यवातीने हा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा  शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर,  जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, कैलास जाधव,  जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष  रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे,  सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख,  किसन सोनवणे, सोमनाथ बोंतले,  संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे,  रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी दिला.

Post a Comment

0 Comments