अहमदनगर जिल्ह्यातील ५ धरणे ९० टक्क्यांवर भरली
अहमदनगर : राज्यात सुरू असणाऱ्या या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमध्येही पाण्याची आवक वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील जवळपास५धरणे ९० टक्क्यांवर पोहचली आहे.तर ३ धरणांची आकडेवारी ८० टक्क्यांच्या पुढे आहे .
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र चांगला जोरदार पाऊस झाला. यानंतर पावसाचा जोर ओसरला. जवळपास आठ ते नऊ दिवस पावसाने उघडीप दिली. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत होता . पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. १५ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.१६ ऑगस्ट राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता.
काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे.मात्र राज्यात सुरू असणाऱ्या या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमध्येही पाण्याची आवक वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील भंडारदरा ,निळवंडे ,आढळा ,डिंभे ,आणि भोजापूर ही ५ धरणे ९० टक्क्यांवर पोहचली आहेत.तर विसापूर,मुळा ,आणि घोड ही धरणे ८० टक्क्यांपुढे पोहोचली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा पुढील प्रमाणे
भंडारदरा : ९६.२६ टक्के ,निळवंडे : निळवंडे: ९१.१२ टक्के,सीना :३४.३८ टक्के ,खैरी : ७३.०३ टक्के, विसापुर : ८४.९४ टक्के ,मुळा : ८८.७५ टक्के,
आढळा : १००.०० टक्के,डिंभे : ९१.९७ टक्के,घोड : ८८.११ टक्के, मांडओहोळ : ७.३१ टक्के, घा.पारगाव : शून्य टक्के ,भोजापुर : ९६.६८ टक्के ,
पिंपळगाव जोगा : ३५.८८ टक्के, येडगाव : ७३.७५ टक्के ,वडज : ७४.६६ टक्केमाणिकडोह : ५३.५६ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
0 Comments