औरंगाबाद : खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप

 औरंगाबाद : खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप

मारहाणीत जखमी झालेल्या दोघांपैकी एका मृत्यू झाल्याप्रकरणात दाखल खुनाच्या गुन्ह्यात आरोपी ठरवलेल्या सहा जणांना जन्मठेप आणि प्रत्‍येकी दोन हजार रुपयांचा दंडाशी जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही. एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी सुनावली.

वेब टीम औरंगाबाद : मारहाणीत जखमी झालेल्या दोघांपैकी एका मृत्यू झाल्याप्रकरणात दाखल खुनाच्या गुन्ह्यात आरोपी ठरवलेल्या सहा जणांना जन्मठेप आणि प्रत्‍येकी दोन हजार रुपयांचा दंडाशी जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही. एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी सुनावली.औरंगाबाद तालुक्यातील घारदोन येथे २६ जून २०२१ रोजी रात्री शेतातून टॅक्‍ट्रर नेल्‍याच्‍या कारणावरुन नातेवाईक असलेल्या बाप लेकाला बेदम मारहाण करण्‍यात आली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेले माणिकराव नवपुते (६५) यांचा उपचारादरम्यान मृत्‍यू झाला. या प्रकरणात १२ जणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

रवि ऊर्फ रवींद्र श्रीराम नवपुते (२२), अमोल बद्रीनाथ नवपुते (२१), हरि उर्फ हरिभाऊ बाबुराव नवपुते (२१), भास्‍कर भुंजगराव नवपुते (४८), राम ऊर्फ रामभाऊ बाबुराव नवपुते (२५) आणि श्रीराम जनार्धन नवपुते (४८, सर्व रा. घारदोन) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी

मृत माणिकराव नवपुते यांचा मुलगा गोरख नवपुते (३८) याने चिकलठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीची घारदोन येथील शेतात जाण्‍यासाठी फिर्यादीचे चुलत भाऊ श्रीराम नवपुते व भास्‍कर नवपुते यांच्‍या शेतातून रस्‍ता आहे. घटनेच्या दिवशी सकाळी फिर्यादी व त्‍यांचा भाऊ विक्रम असे दोघे शेतात रोटा मारत असतांना टॅक्‍ट्रर चालक दीपक नवपुते याला रवि नवपुते याने फोन करुन तु माझ्या शेतातून टॅक्‍ट्रर का घेवून गेला म्हणुन शिवीगाळ केली होती.

रात्री वरील आरोपी हे साथीदारांसह विक्रमच्‍या घरी आले. त्‍यांनी विक्रमला शिवीगाळ करुन लोखंडी शिवळ्याने त्‍याचे डोके फोडले. आवाज ऐकून फिर्यादी, माणिकराव नवपुते हे भांडण सोडविण्‍यासाठी गेले असता आरोपींनी त्‍यांनाही लोखंडी गजाने, शिळाने मारहाण जबर मारहाण केली. उपचारादरम्यान जखमी माणिकराव यांचा मृत्‍यू झाला. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक व्‍ही.आर. पा‍टील यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्‍वये जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी एक हजार रुपये दंड, कलम ३०७ अन्‍वये ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजर रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.उर्वरीत सहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments