तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम

 तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम

रामवाडीतील  सामाजिक कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम

नगर : राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात मात्र माहिती अभावी या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाही राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती रामवाडीतील नागरिकांना व्हावी व त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी रामवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाद्वारे दर रविवारी शासनाकडून दिला जाणाऱ्या सवलतीची माहिती व योजनांची माहिती नागरिकांसाठी रामवाडीतील नागरिकांसाठी राबविली जाते.

 केंद्र शासनाची आयुष्यमान भारत या योजनेची सविस्तर माहिती व ती शासनाकडून या योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या लाभधारकां ची माहिती व लाभधारकांची नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. आयुष्यमान भारत योजनेतून दरवर्षी नोंदणी कृत रुग्णालयातून या योजनेतील लाभधारकांवर प्रति कुटुंबा मागे पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येतात.

  मात्र या योजनेतील लाभधारकांना त्याची माहितीच नव्हती त्यामुळे हे लाभधारकही  या योजनेतून वंचित राहिले म्हणून रामवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विकास उडानशिवे यांच्या पुढाकाराने या योजनेची माहिती 

लाभधारकांपर्यंत पोहोचविण्यात आली.  त्यांना या योजनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर निलेश भुसारी, जिल्हा समन्वयक डॉक्टर मयूर मुथा  यांनी सहकार्य केले. डॉ .मयूर मूथा यांनी जिल्ह्यातील ४३ अधिकृत रुग्णालयांबद्दल माहिती दिली .तर डॉ. निलेश भुसारी यांनी १२०९ आजारांवर या योजनेअंतर्गत उपचार केले जातात अशी माहिती दिली.    वनीता  कॉम्प्युटर्स संचालक मनोज भुजबळ  यांनी या योजनेतील लाभधारकांची त्यांच्या आधार कार्ड च्या सहाय्याने नोंदणी केली.यावेळी सुमारे ५० नागरिकांची नावे या योजनेत समाविष्ट असल्याची माहिती दिली.  

 सुरुवातीला विकास उडानशिवे यांनी प्रास्ताविक केले व हा उपक्रम राबवण्यामागची भूमिका विषद केली.

 विलास धाडगे, सनी चखाले, आकाश मामड्याल ,सनी साबळे, राजू कांबळे, मयूर चखाले, रोहन जगताप, मयूर उडाणशिवे, समीर चांदणे, चैतन्य अडागळे, अजिंक्य भालेराव, तेजस प्रभुणे, ओंकार उमाप, लखन खुडे, दीपक भोसले, आकाश शिंदे यांनी परिश्रम घेतले विकास उडानशिवे यांनी सर्व उपस्थित व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments