लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा देशात लागू करण्यात यावा मागणी साठी नगरमध्ये मोर्चा

 लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा  देशात लागू करण्यात यावा मागणी साठी नगरमध्ये मोर्चा 


वेब टीम अहमदनगर :  सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित “लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हिंदू धर्म रक्षण विराट मोर्चाच्या सहभागी होण्यासाठी अनेक हिंदू संघटनाचे कार्यकर्ते विविध पक्षांचे बुधवारी (दि.१४ डिसेंबर) सकाळी माळीवाडा बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौकात‌ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोर्चात भाजपा,शिवसेना , शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , हिंदुराष्ट्रसेना , विश्व् हिंदू परीषद आदी संघटनांचे कार्यकर्ते सामील झाले होते .  माळीवाडा बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरवात झालेला हा मोर्चाचे गणपती विसर्जनमार्गाने  जात दिली दरवाजा बाहेर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. 

   श्रद्धा वालकर च्या हत्या प्रकारांना नंतर राज्यात संतापाची लाट आहे त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही  लव जिहादविरोधी कायदा करण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत . 

दरम्यान या मोर्चास‌ कालीचरण महाराज यांनी दिल्लीगेट येथे आयोजित सभेस संबोधित केले. .

Post a Comment

0 Comments