।। जागर शक्तीचा ।। जागर नवदुर्गांचा - कालरात्री

।। जागर शक्तीचा ।। जागर नवदुर्गांचा ।।

कालरात्री

जेव्हा देवी पार्वतीने आपल्या अंगावरील सोनेरी रंगाची कातडी उतरवली आणि शुंभ - निशुंभाशी युद्धास सज्ज झाली. देवी पार्वती च्या त्या अवतारास कालरात्री नाव प्राप्त झाले. कालरात्री हे देवी पार्वतीचे सर्वात भयावह आणि क्रूर स्वरूप मानले जाते. 

पूजन:

देवी कालरात्रीचे पूजन नवरात्रीच्या सातव्या दिवशी केले जाते. 

अधिपत्यातील ग्रह:

असे म्हणले जाते कि शनी हा ग्रह देवी कालरात्रीच्या अधिपत्याखाली येतो. 

देवीचे वर्णन : देवी कालरात्रीचा वर्ण काळा असून ती गाढवावर आरूढ असते. तिला चार हात असून तिचे दोन्ही उजवे हात अभय व  वरद  मुद्रेत असतात आणि दोन्ही डाव्या हातांमध्ये धारदार पोलादी कोयता आणि वज्र सारखे दिसणारे आयुध धारण केलेले आहे. जरी कालरात्री हे पार्वतीचे भयावह स्वरूप असले तरी ती तिच्या भक्तांना अभय आणि वराड मुद्रेने आशीर्वाद देते . 

तिच्या भयावह स्वरूपात दडलेल्या शुभ आणि पवित्र शक्तींमुळे देवी कालरात्रीला शुभंकरी  हे नाव देखील प्राप्त आहे. रातराणीची फुले कालरात्रीला प्रिय असतात. 

मंत्र : ॐ देवी कालरात्र्यै नमः॥

प्रार्थना : 

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।

लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी॥

वामपादोल्लसल्लोह लताकण्टकभूषणा।

वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥

स्तुती : या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


देवी ध्यानम :

करालवन्दना घोरां मुक्तकेशी चतुर्भुजाम्।

कालरात्रिम् करालिंका दिव्याम् विद्युतमाला विभूषिताम्॥

दिव्यम् लौहवज्र खड्ग वामोघोर्ध्व कराम्बुजाम्।

अभयम् वरदाम् चैव दक्षिणोध्वाघः पार्णिकाम् मम्॥

महामेघ प्रभाम् श्यामाम् तक्षा चैव गर्दभारूढ़ा।

घोरदंश कारालास्यां पीनोन्नत पयोधराम्॥

सुख पप्रसन्न वदना स्मेरान्न सरोरूहाम्।

एवम् सचियन्तयेत् कालरात्रिम् सर्वकाम् समृध्दिदाम्॥

स्तोत्र: 

हीं कालरात्रि श्रीं कराली च क्लीं कल्याणी कलावती।

कालमाता कलिदर्पध्नी कमदीश कुपान्विता॥

कामबीजजपान्दा कमबीजस्वरूपिणी।

कुमतिघ्नी कुलीनर्तिनाशिनी कुल कामिनी॥

क्लीं ह्रीं श्रीं मन्त्र्वर्णेन कालकण्टकघातिनी।

कृपामयी कृपाधारा कृपापारा कृपागमा॥


देवी कवच : 

ऊँ क्लीं मे हृदयम् पातु पादौ श्रीकालरात्रि।

ललाटे सततम् पातु तुष्टग्रह निवारिणी॥

रसनाम् पातु कौमारी, भैरवी चक्षुषोर्भम।

कटौ पृष्ठे महेशानी, कर्णोशङ्करभामिनी॥

वर्जितानी तु स्थानाभि यानि च कवचेन हि।

तानि सर्वाणि मे देवीसततंपातु स्तम्भिनी॥

Post a Comment

0 Comments