कुमारसिंह वाकळे यांच्या इशाऱ्यानंतर फेज -२ चे काम पुन्हा सुरू

कुमारसिंह वाकळे यांच्या इशाऱ्यानंतर फेज-२ चे काम पुन्हा सुरू 

वेब टीम नगर : बोल्हेगाव नागापूर परिसरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध भागांमध्ये गंभीर स्वरूपाचा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे त्यांना विविध प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे,मनपा प्रशासनाला वेळोवेळी सूचना करूनही या पाणी प्रश्नाकडे अक्षरशा: दुर्लक्ष केले आहे.

हा पाणी प्रश्न सुरळीत व्हावा यासाठी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी मनपा प्रशासनाला इशारा दिला होता की,बोल्हेगाव-नागापूर परिसराला फेज २ पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करा अन्यथा विळद पंपिंग स्टेशनचा ताबा घेणार असा इशारा दिला होता,त्यामुळे मनपा प्रशासन खडबडून जागे होत प्रभाग क्रमांक ७ मध्ये फेज टू पाणी योजनेचे काम सुरू केले आहे सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश आले व बोल्हेगाव- नागापूर परिसरामध्ये फेज टू पाणी योजनेचे काम जलदगतीने सुरू झाले.

सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बोल्हेगाव- नागापूर परिसरामध्ये फेज टू पाणी योजनेचे काम सुरू झाले यावेळी संजय काकडे,गोरक्षनाथ तोडमल,दादासाहेब वांढेकर,अशोक वीर,गोविंद नन्नवरे,अरूण रेपाळे,सुनिता हुलजुते,सुवर्णा हुलजुते,सविता जगदाळे,हिराबाई शिंदे, सारीका शिंदे,संगिता पाडळे,कांचन मांढण,लता राऊत, संगिता वर्पे,सुमन शेंडकर,सईबाई जाधव,पंढरीनाथ भगत तसेच आदि नागरिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments