हस्तिदंताची तस्करी करणारी टोळी गाडीसह जेरबंद

हस्तिदंताची तस्करी करणारी टोळी गाडीसह जेरबंद 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

वेब टीम नगर : १ जुलै रोजी स्थानीक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चैन स्नैचिंग गुन्हयातील आरोपीकडे तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे दोन इसम हस्तीदंत विक्री करणेसाठी येणार आहेत . 

 खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर माहिती श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक आमदनगर यांना कळवली.मनोज पाटील पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक  अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. या  आदेशान्वये पोनि. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि. गणेश इंगळे,पोसई. सोपान गोरे,सफौ. राजेंद्र वाघ,पोहेकाॅ. बापूसाहेब फोलाणे,देवेंद्र शेलार,पोना.  भीमराज खर्से,सुरेश माळी,पोना. शंकर चौधरी,रवि सोनटक्के,पोकॉ. सागर ससाणे व मच्छिंद्र बर्डे लागलीच असे पथक तयार करून कारवाई करणे बाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले.सदर सूचनाप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे वेशांतर करून सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळात दोन इसम टोल नाका परिसरात संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यापैकी एकाच्या पाठीवर मिल्ट्री रंगाची सॅक होती.सॅक मधून काहीतरी भाग वर आलेला व त्यास रुमाल बांधलेला होता थोडा वेळ थांबल्यानंतर संशयित इसमा जवळ एक ग्रे रंगाची आय-२० कार येऊन थांबली व कार मधून चार इसम खाली उतरले संशयित दोन्ही इसम कार मधून आलेल्या इसमांना सॅक मधून एक मोठा हस्तिदंत सारखी वस्तू दाखवून बोलत असताना हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेले इसम हेच आहेत, अशी पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यांनी संशयित इसमांवर झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांची अंग झडती घेतली असता त्यांचे ताब्यात हस्थिदंत सारखी वस्तू मिळून आली.संशयित इसमांना त्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी हस्तिदंत खरे असून ते विक्री करण्यासाठी आलो अशी कबुली दिल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) व्यंकटेश दुराईस्वामी वय ४० वर्ष रा.हल्ली, वाकडी फाटा दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर २) महेश बाळासाहेब काटे वय ३० रा. आखेगाव तालुका शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे हस्तिदंत बाबत विचारपूस करता त्यांनी शेवगाव येथील महेश मरकड व त्याचे इतर साथीदारांना काळया बाजारात हस्थिदंत विक्री करण्यासाठी आलो असे सांगितले.हस्तीदंत कुठून आणले आहेत याबाबत तपास चालू आहे.सदर आय-२० कार मधून आलेल्या व ताब्यात घेतलेले इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) महेश भगवान मरकड वय २६ वर्ष रा. गहिलेवस्ती शेवगाव २) सचिन रमेश पन्हाळे वय ३३ वर्ष राहणार आखेगाव तालुका शेवगाव ३) निशांत उमेश पन्हाळे वय २५ वर्ष रा. भगतसिंग चौक शेवगाव ४) संकेत परशुराम नजन वय २३ वर्ष रा.पवार वस्ती शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी व्यंकटेश दुराईस्वामी व महेश काटे यांच्याकडून हस्तिदंत खरेदी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले, 

उपवन संरक्षण अधिकारी अहमदनगर यांनी हस्तीदंत हे प्राथमिक तपासणीमध्ये अस्सल खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधी आदि करिता हस्तिदंतांचा वापर होत असल्याने हत्तीचे दातांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे मात्र दातांची किंमत जाहीर केल्यास हस्तीचे दातांच्या तस्करीसाठी हत्तीची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यात बंदी घातलेली आहे.सदरील घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सदर इसमाविरुद्ध भादविक ४२९ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६),९,३९,४४,(ब),५० व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक,श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

Post a Comment

0 Comments