घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोर गजाआड

घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोर गजाआड 

वेब टीम श्रीगोंदा : ७ जून २०२२ रोजी फिर्यादी राजेंद्र श्रीमंत भोस वय ४६ वर्षे रा. तांदळी दुमाला ता. श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की, तांदळी दुमाला येथील घराचे दरवाजाची कडी कोंडा तोडुन त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने व चांदीच्या पट्टया कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे.त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या  गुन्हयाचा तपास चालू असताना रामराव ढिकले (पोलीस निरीक्षक श्रीगोंदा, पोलीस स्टेशन) यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार किरण उर्फ सोन्या युवराज काळे बिटकेवाडी, ता.कर्जत, प्रविण शहाजी पवार रा.धालवडी ता.कर्जत यांनी केला आहे.त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हेगारी वस्त्यांवर कॉबिंग ऑपरेशन करण्यास सांगुन, आरोपी ताब्यात घेण्यास सांगितले. सदर आरोपी बिटकेवाडी ता. कर्जत येथे आल्याची माहीती मिळाल्यावरुन दिनांक १० जून २०२२ रोजी बिटकेवाडी ता. कर्जत येथे कॉबिंग करून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी इंद्रजित सायट्या पवार रा.कर्जत ता.कर्जत जि.अहमदनगर याचेकडे चौकशी केली असता त्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दाखल भा.द.वि.क.४५७,३८० हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.आरोपी किरण काळे व प्रविण पवार हे श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.क.४५७,३८० मध्ये पोलीस कस्टडी मध्ये आहे.पोलीसांनी दोन्ही आरोपींकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे ईतर तीन साथीदारांसह दौंड व आळेफाटा या ठिकाणी केलेल्या दरोडा व घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.


दौंड पोलीस ठाणे ग्रामिण,भा.द.वि.क.३९५,३९७ प्रमाणे पुणे ग्रामिण, आळे फाटा पोलीस ठाणे पुणे ग्रामिण भा.द.वि.क.४५७,३८० आरोपी किरण उर्फ सोन्या युवराज काळे वय २५ वर्षे रा.बिटकेवाडी ता.कर्जत याचेवर पुर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.क.४५७,३८० भा.द.वि.क.३७९ सदर गुन्हेगार हे दरोडा व घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत. अशी माहिती स्थानिक पोलीसांनी दिली आहे.(फोटो-श्रीगोंदा चोर )

Post a Comment

0 Comments