'भाषा सन्मान पुरस्कार' डॉ. मोहम्मद आझम यांना जाहीर
अहमदनगर कॉलेज च्या वतीने सत्कार
वेब टीम नगर : अहमदनगर कॉलेजच्या वतीने माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. मुहम्मद आझम यांना त्यांच्या 'कदमराव पद्माराव दख्खनी चा आद्य काव्यग्रंथ दख्खनी- मराठी घोषणा' या संशोधन कार्यासाठी साहित्य अकादमी नवी दिल्लीच्या वतीने दिला जाणारा भाषा सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस जी यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नोएल पारगे, डॉ. रझाक सय्यद, प्रा.डॉ. सुधाकर शेलार सर आणि हिंदी विभाग प्रमुख, प्राध्यापिका डॉ. रिचा शर्मा उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदी विभागाच्या वतीने डॉ. आझम यांच्या सन्मानाकरिता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात रयत शैक्षणिक संस्थेचे माजी प्राचार्य डॉ.विश्वासराव काळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त हिंदी प्रेमी श्री.विनायक पोवळे, मराठी कवयित्री रिता ठाकूर, अहमदनगर महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. डॉ.भागवत पारकाळ, डॉ.अशोक बोरुडे, डॉ.पराग आठवले, प्रा.अशोक घोरपडे, डॉ.पौर्णिमा बेहेरे, प्रा.सबिना शेख व साहित्यप्रेमी विद्यार्थी उपस्थित होते.
हिंदी विभागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. आझम यांनी त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली आणि अनेक भाषा शिकण्याचे फायदेही सांगितले. त्यांच्या विचारातून विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळाली.
0 Comments