पैसे मागितल्याच्या रागातून पतीपत्नीस मारहाण
वेब टीम राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे पैसे मागितल्याच्या रागातून पती पत्नीवर गुप्तीने वार करून,लाकडी काठी व लाथा बुक्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना २३ जून रोजी घडली आहे.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय सुंदर मकासरे (वय ४२ वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी)यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.23 जून रोजी साडेनऊ वाजे दरम्यान दत्तात्रय मकासरे व त्यांच्या घरातील इतर लोक त्यांच्या घरासमोर असताना तेथे आरोपी आले.तेव्हा आरोपी सर्जेराव मकासरे याने दत्तात्रय मकासरे यांना १० हजार रुपये परत मागितले.तेव्हा दत्तात्रय मकासरे त्याला म्हणाले, तू डेअरीमधील उचल घेतलेले पैसे भरले नाही.त्यामुळे त्यांनी माझ्या डेअरीच्या पगारातून १६ हजार रुपये कापून घेतले. तू मला आतापर्यंत १० हजार रुपये दिले आहेत.उरलेले ६ हजार रुपये देऊन टाक.असे म्हणाल्याचा व पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपींनी दत्तात्रय मकासरे व त्यांची पत्नी शितल मकासरे यांच्यावर गुप्तीने वार केले. यावेळी भांडण सोडविण्यासाठी दत्तात्रय मकासरे यांचा मुलगा व मुलगी आले. तेव्हा त्यांनाही लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
मकासरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सर्जेराव सुंदर मकासरे, सुरज सर्जेराव मकासरे दोघे रा.वांबोरी, ता. राहुरी तसेच महेश पागीरे, अभिषेक चांदणे दोघे रा. एमआयडीसी नगर या चारजणांवर जबर मारहाण व आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास हवालदार वाल्मिक पारधी हे करीत आहेत.
0 Comments