बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन वाहने मूळ मालकांना परत

बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन वाहने मूळ मालकांना परत 

वेब टीम नगर : मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांना तपासादरम्यान मिळून आलेल्या बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन वाहने मूळ मालकांना परत करणेबाबत आदेश दिले होते.नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री/अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणूक करून स्थानिक गुन्हे शाखेकडे ३८ बेवारस मोटरसायकलचे मूळ मालकांचा शोध घेऊन मोटरसायकल चोरी बाबत दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करणे बाबत तपास पथकाला सूचना व मार्गदर्शन केले.

नमूद सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील पोसई. सोपान गोरे,पोहेकॉ/संदिप पवार,विश्वास बेरड,संदीप घोडके, देवेंद्र शेलार,पोना. शंकर चौधरी,विजय ठोंबरे,पोना. सचिन अडबल,असे बेवारस मोटरसायकलचे मूळ मालकांचा शोध घेत असताना पोलिस निरीक्षक/कटके यांना बेवारस वाहनांची माहिती संकलित करून मूळ मालकापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करणारे विजय डिटेक्टिव जिल्हा कोल्हापूर यांची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कटके यांनी विजय डिटेक्टिव्ह कोल्हापूर यांच्याशी संपर्क करून तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे असलेल्या ३८ बेवारस मोटरसायकल चे मूळ मालकां पर्यंत पोहोचविण्यासाठी मदत घेतली.तपास पथकाने विशेष मेहनत घेऊन बेवारस मोटरसायकलचे अस्पष्ट झालेले चेशी व इंजिन नंबर घेऊन कंपनीचे मुख्य कार्यालयाशी संपर्क करून मूळ मालकांची नावे व पत्ते प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क केला सदर बेवारस मोटर सायकल चे मालक तेच आहे अशी खात्री झाल्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे सादर करून मोटरसायकल घेऊन जाणे बाबत कळविले.दि.२१/०६/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील ३८ बेवारस मोटर सायकल वाहन मालकां पैकी १३ मूळ मालकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे त्यांच्याकडील मूळ कागदपत्र हजर केले विशेष पथकाने सदर कागदपत्रांची शहानिशा व खात्री करून १ मोटर सायकल आडगाव पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक येथील तपासी अंमलदार यांचे ताब्यात देऊन इतर १२ गाड्या मूळ मालकांना पोलीस निरीक्षक अनील कटके यांच्या हस्ते बेवारस मोटरसायकल ताब्यात देण्यात आल्या

मोटारसायकल मूळ मालकांची यादी खालील प्रमाणे

१)चुंबुर रावसाहेब भिसे रा.मलठण तालुका कर्जत २) संतोष सोपान यादव राहणार निरली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ३) एकनाथ दादा मिरपगार मिरी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ४)दत्ताप्पा भगवंतराव मंडेकर रा.व्हिस्टा अपार्टमेंट चिखली पुणे ५) मारुती नारायण आवटी राहणार आर्वी तालुका जुन्नर जिल्हा पुणे ६) बाळू नामदेवसिंग परदेसी राहणार नरवाड पोस्ट खेड नाशिक ७) भगीर कोंडाजी आवारे राहणार खेरवडी निफाड जिल्हा नाशिक ८) बाळासाहेब विष्णू होळकर राहणार नेप्ती अहमदनगर ९) महेश वसंतराव अकोलकर राहणार सावेडी अहमदनगर १०) अरुण पोपट संसारे सेंट मेरी चर्च नागपूर एमआयडीसी अहमदनगर ११) प्रभू किरण अनुगरी १२) अनिल बबनराव कटारिया राहणार स्टेशनरोड अहमदनगर १३) मनोज देवीचंद चोपडा राहणार घोटी जिल्हा नाशिक

सदरील कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments