नगर परिषदेच्या आवारातच माजी सैनिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नगर परिषदेच्या आवारातच माजी सैनिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

वेब टीम कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेच्या आवारात माजी सैनिकाने आज अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.घराशेजारील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने माजी सैनिक दिवाकर सयाजी मकासरे वय ७४ यांनी आत्महत्या करण्याचं टोकाच पाउल उचललं आहे.

नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या आवारात उभे असलेल्या नागरिकांनी हे कृत्य करताना पाहिलं आणि त्यानंतर मकासरे यांना रोखल्याने त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दिवाकर मकासरे यांनी १७ वर्ष भारतीय सैन्यदलात सेवा केली आहे. सन १९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत त्यांनी देशसेवा केली आहे.तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर मकासरे कोपरगाव शहरातील निंबारा मैदान येथे राहायला गेले.शेजारील नागरिकाच्या अतिक्रमणाचा नाहक त्रास होत असल्याने २०१६ पासून त्यांनी याबाबत प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली नसल्याने टोकाचं पाऊल उचललं,असं मकासरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.दिवाकर मकासरे यांनी पालिका आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला असता,त्यांची मुख्याधिकारी यांनी समजूत काढली व तत्काळ सदर ठिकाणी भेट देऊन वादावर तोडगा काढला,अशी प्रतिक्रिया कोपरगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिलीय. 

Post a Comment

0 Comments