टोल नाक्यावर पावती देण्याघेण्या वरून मारामारी

टोल नाक्यावर पावती देण्याघेण्या वरून मारामारी 

वेब टीम नगर : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील जामखेड रस्त्यावरील टोलनाक्यावर पावती देण्या-घेण्याच्या कारणातून टोलनाक्यावर काम करणा-या कर्मचा-यांना काही नागरिकांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.१३) सायंकाळी घडली आहे.

या मारहाणीत जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात राञी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता, त्यांनी जामखेड रस्त्यावरील कॅन्टोन्मेंट बोर्ड नाक्यावरील कर्मचा-यांना काही नागरिकांनी गाडीतून येऊन मारहाण झाल्याची घटना घडली आहे, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments