कथा ज्ञानेश्वर माउलींच्या शुध्दीपत्राची : भाग -१

इतिहासाच्या पाऊलखुणा : कथा ज्ञानेश्वर माउलींच्या शुध्दीपत्राची : भाग -१ 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर  रौप्य महोत्सवी संजीवनी समाधी सोहोळा पूर्तीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी हस्तलेखन सोहोळा गुढीपाडव्याच्या दिवशी श्री महंत भास्करगिरी महाराज, श्री दत्त देवस्थान देवगड आणि नामदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत वह्यांचे वाटप करून या उपक्रमाला 'पैस' खांबाचे मंदिर नेवासे येथे सुरवात केली आहे. तसेच वरील कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर माउली व भावंडे यांना श्री क्षेत्र पैठण येथून मिळालेले 'शुध्दीपत्र' याचा प्रपंच श्री नारायण आव्हाड यांच्या लेखणीतून सादर करीत आहे. 

ज्ञानदेव, निवृत्ती ,सोपान, आणि मुक्ताबाई यांना धर्ममार्तंड आळंदी येथील ब्राम्हणांनी संन्याशाची मुले म्हणून त्यांची खूप हेळसांड ,अवहेलना केली.त्यांना शुध्दीपत्र आणण्यासाठी २ वेळेस पैठण येथील धर्मसभेत पाठविण्यात आले.आळंदी ते पैठण या मध्ये जातांना त्यांना अहमदनगर जिल्ह्यातूनच जावे लागत होते.दुसऱ्या खेपेला जेव्हा चारही भावंडे शुध्दीपत्र आणण्यासाठी  गेले त्या वेळेला माउलींनी रेड्यामुखी वेद वदवून आपली पात्रता धर्मसभेला सिद्धी करून दाखवली आणि धर्मसभेने टाळ्यांच्या गजरात 'ज्ञानेश्वर महाराज कि जय' अशा घोषणा दिल्या. या जल्लोषाच्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांना शुध्दीपत्र दिले किंवा नाही. 


काही अभ्यासकांच्या मते दिले तर काही अभ्यासकांच्या मते नाही दिले. भिंगारकर सांगतात ज्या ब्राम्हणांचा ज्ञानदेवांनी चमत्कार दाखवून गर्वहरण केले. त्या सर्वांची मान्यता घेऊन बोपदेवांनी गद्यपद्यात्मक असे स्वरचित शुध्दीपत्र शके १२०९ माघ शुक्ल पंचमी या दिवशी ज्ञानदेवांना अर्पण केले.हे शुध्दीपत्र भिंगारकर यांनी आपल्या 'श्र्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळ निर्णय व चरित्रं' या पुस्तकात लिहिले आहे.ते शुध्दीपत्र येथे देत आहे. ते शुध्दीपत्र संस्कृत मध्ये लिहिले आहे. असे नारायण आव्हाड यांनी सांगितले. 

संस्कृत शुध्दीपत्र 

"स्वस्ति श्री मत्सकल भुमंडल मंडनीभुतः अखंड प्रचंडवैत दिक वेतंडगंड 

स्थलखंड नैकहरयः गिरधोs खिलतत्व प्रकाशन सूत्किरत्नाना

तरयोs शेषशास्त्रजलधे: नानानीवृदल करणमणयो निखिल विद्वांसंसः 

शृणध्वमेता प्रणशी परंपरोषेता  प्रतिष्ठानमधितिष्ठतां सुपर्वणीमस्माकं भ्यर्थनाम 

यद्दभततममूदभुतमीहप्रत्यक्षमपक्षपातमनुभुतं तदेवं देवदेव सक्षिक 

स्वाक्षीकलित पुरतः शुभवंताभवता प्रकाशयामः  

विप्रः कश्चन सत्पुरश्चरणतः भीवेदमातुः सुतम 

सेभे विठ्ठलपंतनामकमसौ जातोपनीतिर्गुशैः

संप्राप्तो निगमागमान समगमतीर्थसार्थेच्छाया II१II

आळंदीतीप्रथित निगमे भव्यदिव्य प्रसंगात 

सिद्धोपंतव्दिनानीतनुजा रुक्मिणी प्राप्य पत्नीम I

षडभिर्वषैस्तनयमनया नैव सब्ध्वा प्रसुप्ता 

मेना हित्वा निशी निशीतया प्राय कशी विरक्त्या II२II                                 

रामानंदाल्लब्ध सन्यासदिक्ष त्व श्रुला हंत कारां नीतासम 

शानस्वाना सेवामाना विमाना स्वर्णाश्वत्थ नाथ नाथस्य दैवात II३II

तत्रैवादा दैशिक संप्रण स्य़ैैतस्मा त्पुत्राशिर्वचः प्राप्य खिन्ना 

श्रुत्वा वृत्तं दत्त चित्तेन तेन नीताs भीता प्रतधैर्यापस्ताशीम II४II

स विठ्ठलं तंत्रजगौ सगौरवं विहाय चानात्पसुतांपातिव्रतां 

तथापि नोक्तास्यृणवात्भयांंच्छलात ब्लात विरत्काभममाभितः कृतः II५II                          

ममायाsतो घृतकुंभसंभवस्यजातकर्मादिविधान संस्कृतः 

स्मा पुनः प्रोअह तत्र पुत्राकांस्य त्रिन हरेरंशभवानभवानीयात II६II

 ईत्थमसध्यमपी मुहुः प्रसह्य गुरुणारुणाक्षमुक्तः सः 

विधिना पुनरपि विधिना गृही तयाsभूदगृहीतया नतया II७II

प्रारब्धलेखनविधौ विपर्ययादेव वर्णधर्मस्य 

यतिरपि पुनः पतीरभूदि त्युक्त्वासौ बहिष्कृतो विप्रैैः II८II

वृतान्तस्याबोधात श्रुत्वाप्य श्रद्धया पूनर शोधात 

शिष्टाचार विरोधात समुsसितो मत्सरात्परैः क्रोधात II९II 

अभवती वृत्तिमुख्यं ज्ञानेश्वरमध्यम सुतभितयं 

सोपानातं तुर्या तुर्यावस्थारता सुता मुक्ता II१०II

जातोपनितीसमया स्तनया इति विप्रमंडली समया

प्रोचे वाचा समया क्षम्यो दोषो धृव कृतः स मया II११II

स विठ्ठलो विप्र दरैरगादी कापी प्रतिष्ठान पुरेsत्र तस्मात 

शुद्धी प्रतिष्ठानपुरे लभस्व निवेध सर्व स्वकृतं विगर्वम II१२II 

पुुत्रैः सम सोथ सम स्वचित्तं कृत्वा प्रतिष्ठानमिदं प्रयातः

स्वमातुलस्यालयमध्यवात्सीत सोप्युsझितो स्माभीरमुुष्यसंगात II१३II 

क्रमशः                             

संदर्भ - संग्रहालय ग्रंथालय अहमदनगर 

प्राचीन मराठी वांग्मयाचा इतिहास ,

डॉ.अच्युत नारायण देशपांडे 

व्हीनस प्रकाशन 

पण नं २३१,२३२ , आवृत्ती सन १९६९ 

लेखक : नारायण आव्हाड 

९२७३८५८४५७ / ९८८१९६३६०३


Post a Comment

0 Comments