विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार गुन्हा दाखल
वेब टीम पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल वसंत गायकवाड (वय ३५, रा. इराणी मार्केट, येरवडा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गायकवाड आणि तरुणीची ओळख आहे. त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाल्याचे समजल्यानंतर गायकवाडने तिला धमकावले. तिला धमकावून एका रूग्णालयात गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. गायकवाडने रूग्णालयातील कागदपत्रे ताब्यात घेतली.
गायकवाडने वैद्यकीय कागदपत्रे फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.
0 Comments