अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : दीनमित्र १८८८ ते १९४९

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : दीनमित्र १८८८ ते १९४९ 


अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात सोमठाण व खरवंडी या ग्रामीण भागांमध्ये लोकमान्य टिळकांचे केसरी या वृत्तपत्रापेक्षा वेगळ्या धाटणीचे एक मासिक चालू होते.  त्याचे नाव दीनमित्र त्याच्या नावा मध्येच खूप मोठा अर्थ दडलेला आहे . मागील आठवड्यात या लेखामध्ये मी 'ज्ञानोदय', 'वृत्तवैभव;  'न्यायसिंधू', 'जगदादर्श' या वृत्तपत्रा विषयीची माहिती लिहिली आहे . या आठवड्यात मी एका वेगळ्या प्रकारचे  वृत्तपत्र म्हणून ख्याती असलेल्या 'दीनमित्र' वृत्तपत्रा विषयी माहिती लिहित आहे. 

'दीनमित्र'या वृत्तपत्राचे संपादक मुकुंदराव पाटील यांची विचार करण्याची पद्धत फार वेगळी होती.  एका अलग विचार प्रवाहाची  होती.  सत्यशोधक चळवळीचे पहिलेपत्र दीनबंधू या पत्रातील विचार जुळत होते . दीनमित्र या पत्राचे  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एक हाती ते चालत होते.  म्हणजे बातमी गोळा करणे, कंपोज करणे, दीनमित्राचा अंक छापणे आणि नंतर वितरित करणे ही सर्व कामे एकच व्यक्ती करत होती. 

दीनबंधूकार कृष्णाजी भालेराव यांच्या जेष्ठभगिनीयांचे  चिरंजीव गणपतराव पाटील यांचे पालनपोषण भालेकर यांनी केले.  गणपतराव पाटील सुरुवातीला शिक्षकाची नोकरी करत होते.  पण भालेकर यांच्या प्रेरणेने उपदेशाने सन १८८८मध्ये  त्यांनी दीनमित्र नावाचे मासिक चालू केले.  काही दिवस साप्ताहिक म्हणूनही चालवले परंतु ते न जमल्यामुळे परत मासिकात रूपांतर केले.  गणपतराव पाटील खूप चांगले लेखक होते . आणि त्यांच्या नंतर मामा भालेकर यांचा त्यांच्या पाठीवर मामा भालेकर यांचा हात होता.  त्यांनी दीनमित्रच्या  सिल्वर जुबिली अंकात  एक खूप मार्मिक टिपणी केली होती.  अनेककररूपी  जळवा लागले आहेत असा शेतकरी ,शेतकऱ्याच्या घरात उंटाचे पिल्लू घुसले आणि मग शेतकऱ्यांचे  घर  पाडले असे शेतकरी कुटुंब ,शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ग्राम अधिकारी असा भारावलेला शेतकरी वगैरे चित्रे या मासिकात प्रसिद्ध केली होती.  परंतु पुढे अवघ्या  सत्ताविसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि दीनमित्र वृत्तपत्र बंद पडले.  नंतर भालेकरांनी मधल्या काळामध्ये आंबालहरी व शेतकऱ्यांचा कैवारी या नावाने वृत्तपत्र चालवले परंतु ते काही फार काळ चालले नाही.  त्यांची एकसारखे दीनमित्र चालू करण्याची धडपड सुरू होती आणि  म्हणतात ना प्रयत्न  करता वाळूचे तेलही गळे या म्हणीप्रमाणे सण १९१० मध्ये मोठ्या प्रयासाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये सोमठाण या गावातील लोकांच्या मदतीने छापखान्याचे सामान खरेदी केले . छापखान्याचे सामान आले आणि भालेकर खूप आजारी पडले त्यातच त्यांचा ७ मे १९१० मध्ये मृत्यू झाला.  आजारपणातही  त्यांचा  वृत्तपत्र ध्यास काही जात नव्हता.  त्यांनी गणपतराव पाटील यांचा दत्तक पुत्र हा भालेकरांचा औरस पुत्र होता.  त्याला बोलावून त्याच्याकडून दीनमित्र चालू करण्याचे वचन घेऊनच आपला प्राण सोडला. 



मुकुंदराव आणि अत्यंत निष्ठेने आपल्या जनकपित्याचे वचन पाळले.  त्यांनी मोठ्या हिमतीने भालेकरांच्या आत्म्याला शांती मिळेल अशा दिमाखाने व सत्यशोधक निष्ठेने मुकुंदरावांनी दीनमित्र हे वृत्तपत्र चालवले मुकुंदराव यांचे शिक्षण मराठी दुसरी झाले होते.  त्यामुळे लिखाणाचा सराव नव्हता परंतु वडिलांना दिलेल्या वचनाच्या  खातर त्यांनी दिनांक 23 नोव्हेंबर सन 1910 रोजी पहिल्या अंकाला सुरुवात केली.  मदत कोणाचीही नसताना अगदी गावातील मंडळींना हाताशी धरून तरवडी या गावी चालू केले . परंतु कर्मठ विचाराच्या ब्राह्मणवादी लोकांनी पत्र बंद पडावे म्हणून खूप प्रयत्न केले . हा छापखाना शेतामध्ये उभा केला होता बिगरशेती न करता कारखाना उभा केला म्हणून ग्वाल्हेरला शिंदे सरकारकडे तक्रार केली त्यावेळी त्यांनी ७५० रुपये दंड भरावा लागला.  कोल्हापूरचे शाहू महाराज व भास्करराव जाधव यांनी सहानुभूती  दाखवून मुकुंदराव यांना उत्तेजन दिले . पुढे मुकुंदराजांनी दीनमित्र वृत्तपत्र सन १९४० पर्यंत इमानेइतबारे चालू ठेवले नंतर सन १९९२-९३ मध्ये दीनमित्रचा   छापखाना व काही अंक वस्तुसंग्रहालयाला दान केले . 

लेखक : नारायण आव्हाड ९२७३८५८४५७

संदर्भ :  मराठी वृत्तपत्रांचा इतिहास 

पान नंबर- ४०१,४०२,४०३  

संग्रहालय लायब्ररी, अहमदनगर. 

Post a Comment

0 Comments