अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : वारकरी संप्रदाय

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : वारकरी संप्रदाय

एकविसाव्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाला खूप महत्त्व प्राप्त झाले, तसे ज्ञानेश्वर माऊली पासून श्रेष्ठच आहे परंतु 'झी'टाकीज सारख्या प्रसारमाध्यमांमुळे देशात तर प्रसार झालाच  तसेच जगामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाची पताका फडकावली गेली.  त्याचे श्रेय दिले तरी वावगे ठरणार नाही. 

 अहमदनगर जिल्ह्यामध्ये मौजे आगडगाव येथे काळभैरवनाथाचे मंदिरामध्ये 'झी' टॉकीज ने सात दिवस कीर्तन मालिका चे आयोजन केले होते . तसेच पारनेर येथील लंके प्रतिष्ठान यांनीसुद्धा कीर्तनाचे आयोजन केले होते.  जामखेड मध्ये खटोड प्रतिष्ठानने तर भव्य असे स्टेज  उभे करून श्रोत्यांना बसण्यासाठी खुर्च्या सहित सोय करून दिली आहे.  पूर्वीही गावोगावी काही उत्सवाच्या निमित्ताने कीर्तने होत होती पण त्यांचे प्रमाण फार कमी होते परंतु गेल्या दशक, दोन दशकांपासून समाजाला त्याचे खूप आकर्षण वाटू लागले आहे.  आणि त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पांडुरंग वारकरी संप्रदायाच्या अनुग्रहाचा मंत्र राम कृष्ण हरी या प्रकारचा आहे.  हा मंत्र खूप जुना आहे यामध्ये काही महाराज फक्त 'रामकृष्ण' असे सुद्धा म्हणतात हा मंत्र तुकोबा महाराज यांच्या पूर्वीपासून वारकरी संप्रदायात वापरला जात होता. तो मंत्र साधारण ज्ञानदेव व त्यांची भावंडे नामदेव आणि इतर संत-महात्मे यांच्या अभंगात या मंत्राचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला गेला आहे.

  ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 'अनंत नामाचे पाठांतर ! रामकृष्ण नाम  निरंतर रामकृष्ण अशा संसारपिपासा दूर करी!! ' 'राम कृष्ण नाम दोन्ही साजीरी! हृदय मंदिरी स्मरा करे!!निरंतर  ध्याता हरी सर्व कामांची बोहरी ! दोष जाती दिगंतरी रामकृष्ण उच्चरणी !! रामकृष्ण माळा घाला या रे अखंड जीवनकळा राम जपा !ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण मनी आनंद जन्मोनी पुण्य होय!! वरील अभंगांमध्ये ज्ञानदेव महाराजांनी प्रत्येक मध्ये रामकृष्ण या मंत्राचा उपयोग केला आहे.  निवृत्ती महाराज त्यांच्या अभंगात मध्ये सुद्धा याच मंत्राचा उपयोग करतात रामकृष्ण हरी तयासी संसारी सुख आहे रामकृष्ण मंत्र जनासी उद्धार  आणिक हा साचार मार्ग नाही !!याप्रमाणे सोपानदेव व मुक्ताबाई सुद्धा आपल्या अभंगांमध्ये रामकृष्ण या मंत्राचा उपयोग करून ओवी लिहितात सोपानदेव म्हणतात, रामकृष्ण रामनाम हा जप परम ऐसा.  मुक्ताबाई म्हणतात राम-कृष्ण मुक्त जाले  पै अनंत तरले पतीत युगानुयुगे!! नामदेव महाराज म्हणतात मंत्रा माजी  मंत्र सार रामकृष्ण हरी उच्चार नित्य नित्य निर्विकार हरी  जोडले साचारे!! नाम वाचे उच्चारीता  हरे संसाराची व्यथा!! जाती दोषाचीये  चलथा रामकृष्ण उच्चारणी !! भावाब्धितारण  रोहिणीची  मार सकळ  दिसे!! सावतामाळी लिहितात प्रपंच असुनी परमार्थ साधावा वाचे आठवावा रामकृष्ण तर एकनाथ महाराज म्हणतात योग याग तप नलगे साधन नावाचे रामकृष्ण जपे आधी !! याप्रमाणे संत महंतांनी आपापल्या अभंगात रामकृष्ण या मंत्रा चे वर्णन केले आहे. 

श्री म क नाडकर्णी यांनी वारकरी पंथाची दीक्षा दिली जाते त्याबद्दलची माहिती सांगितली आहे, की दिक्षा घेऊ इच्छिणारी व्यक्ती, महिला हे एकशेआठ मण्यांची  तुळशीची माळ घेऊन आपापल्या महाराज ,संत यांच्याकडून दिक्षा घ्यावयाची अथवा गुरु मानावयाचे त्यांच्याकडे जातात . त्यावेळी हे संत महातमे  त्यांनी आणलेली माळ ज्ञानेश्वरीवर ठेवून शिष्यासं विचारतात वारी कुठली करणार आळंदीची की पंढरपूरची असे विचारले जाते दोन्ही वारी पैकी एक वारी कबूल  करून शिष्यास ,परस्त्री, परधन व मद्यपान यांचा त्याग करण्यास सांगतात.  दर महिन्याची एकादशी वद्य व शुद्ध व्रत बंधनकारक होते.  आणि रोज हरिपाठ म्हणणे  आणि जय जय राम कृष्ण हरी असे नामस्मरण करावे लागते हा सर्व विधी करण्याचे साधकाने  कबूल केले की मग गुरू, संत व महात्मे ज्ञानेश्वरीवरील माळ उचलून पुंडलिका वरदे हरी विठ्ठल या गजरात ही माळ  शिष्याच्या गळ्यात घातली जाते.  

हा विधी ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून चालू आहे वारकऱ्यांची रोजची दिनचर्या दररोज सकाळी प्रथम  उठल्यावर पांडुरंगाचे नामस्मरण त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणून चरणावर मस्तक ठेवावे व आपल्या कामास लागावे  स्नानसंध्या करून तुळशीस  पाणी घालावे.  रोज ज्ञानेश्वरी वाचावी नंतर ज्ञानेश्वर पांडुरंग तुकाराम यांचे स्मरण करून जेवणे करावीत.  प्रभू ने आपल्यावर सोपवलेले काम करावे.  काम करताना ही नेहमी खरे बोलावे . आळंदी वा  पंढरपूरची वारी नियमित करावी वेळ मिळेल तसे आवडीने भजन करावे.  शुद्ध सात्विक आहार घ्यावा.  भेटेल त्याच्या पायी नतमस्तक व्हावे हा वारकरी संप्रदायाचा आचार आहे. 

सायंकाळी हात-पाय धुऊन हरिपाठ म्हणावा.  रात्री भोजन करावे बिछान्यावर जाण्यापूर्वी  टाळ वीणा घेऊन पांडुरंगाचे भजन करावे.  प्रभू चिंतनात रंगले असता प्रभूच्या चरणी मस्तक ठेवून झोपी जावे.  याप्रमाणे रोजची दिनचर्या पार पाडावी म्हणजे समाजाची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते व आपल्याला वारकरी संप्रदायाची दीक्षा मिळते.

अहमदनगर जिल्ह्यातील दीक्षा घेतलेले संत-महात्मे पिंपळनेरचे  निळोबाराय, भगवानबाबा, ताहाराबादचे  महिपती महाराज, श्रीगोंदा येथील शेख महंमद बाबा , आरणगावचे  बाळाजी बुवा केडगाव चे  नारायण महाराज, उंबरेचे  उंबरेकर महाराज आजच्या पिढीतील इंदुरीकर महाराज, नामदेव शास्त्री गणेश महाराज शिंदे नगर ,कल्याण महाराज काळे शेवगावकर अशा अनेक संत महात्म्यांनी वारकरी संप्रदायाची पताका फडकावित ठेवली आहे. 

लेखक : नारायणराव आव्हाड

९८८१९६३६०३ 

संदर्भ : संग्रहालय लायब्ररी अहमदनगर

Post a Comment

0 Comments