तो पर्यंत युती शक्य नाही नाही : रावसाहेब दानवे

तो पर्यंत युती शक्य नाही नाही : रावसाहेब दानवे 

वेब टीम मुंबई : राज ठाकरेंचं गुढीपाडवा सभेतलं भाषण आणि नितीन गडकरींनी दिलेली राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दिलेली भेट, यानंतर मनसे आणि भाजपाची युती होईल, अशा चर्चा सुरू आहेत. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या युतींच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.


राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही,” असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. पण ती वेगळ्या विषयावर होणार असून ही भेट राजकीय असणार नाही,” असं रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतियांबाबत त्यांची भूमिका बदलणार नाहीत, तोपर्यंत भाजपा मनसेची युती होणार नाही, हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा स्पष्ट केलंय.

Post a Comment

0 Comments