दहशतवाद्यांचा ड्रायव्हर वर हल्ला
वेब टीम पठाणकोट : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी ड्रायव्हरवर हल्ला केला. सोनू शर्मा असे चालकाचे नाव असून तो पठाणकोटच्या यादर गावचा रहिवासी आहे. दहशतवाद्यांनी सोनूच्या उजव्या मांडीवर बंदुकीतून गोळी झाडली, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्यातील दहशतवादी कारवाया पाहता सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.
लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के
लडाखच्या कारगिलमध्ये गुरुवारी सायंकाळी ५.१२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने अहवाल दिला की भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या वायव्येस 82 किमी अंतरावर होता, 35 किमी भूगर्भात होता. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
0 Comments