सिल्वर ओक हल्ला प्रकरणी ४ संशयित ताब्यात

सिल्वर ओक हल्ला प्रकरणी ४ संशयित ताब्यात 

वेब टीम मुंबई : जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनं दरम्यान झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी ४ संशयितांना अटक केली आहे.तर एमजेटी चॅनलचे चंद्रकांत सूर्यवंशी हे अद्याप फरार आहेत. तर हल्ल्यातील संशयित सच्चीदानंद पुरी याला आज न्यायालयाच्या आवारातून पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडलेल्या संशयितांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे तर महिला संशयितांची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे. 

या सर्व संशयितांना उद्या (दि.१२) रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे पुढील प्रमाणे : सच्चीदानंद पुरी, मोहोम्मद ताजोद्दीन,अभिषेक पाटील आणि संशयित महिला सरिता पवार अशी आहेत.                


Post a Comment

0 Comments