इंडियन काँग्रेस ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पदी शिल्पाताई दुसुंगे

इंडियन काँग्रेस ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पदी शिल्पाताई दुसुंगे 

वेब टीम नगर : इंडियन काँग्रेस ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पदी शिल्पाताई दुसुंगे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र ब्रिगेडच्या कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते शिल्पाताईंना प्रदान करण्यात आले. संघटनेच्या उद्देशानुसार पूर्ण निष्ठेने काँग्रेसची रीती आणि नीती नुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, श्री राहूल गांधी व के.सी. वेणूगोपालजी यांच्या कडून वेळोवेळी दिल्याजाणाऱ्या ध्येय धोरणांना आम जनते पर्यंत पोहोचवण्याचे काम तसेच काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी शिल्पाताई दुसुंगे काम करतील अशी अपेक्षाही चंद्रशेखर पाटील रेवणनाथ देशमुख प्रदेश अध्यक्ष, आय सी बी चे संस्थापक अध्यक्ष ठाकूर विपिनसिंह राजवत,श्रीमती नुरेशा तिर्की ,व राजेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केली. 

जिल्हाध्यक्ष पदाची धुरा श्रीमती दुसुंगे यांच्या खांद्यावर देतानाच जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका अध्यक्ष पदासाठी मुलाखती घेऊन उमेदवारांच्या नियुक्तीचे अधिकारही शिल्पाताईंना देण्यात आले आहेत. 

शिल्पाताई दुसुंगे यांना शिक्षणसंस्था महामंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा १५ वर्षांचा अनुभव आहे.तसेच त्या मानव संसाधन विकासच्या प्रदेश कार्यकारिणीवर १० वर्षांपासून कार्यरत आहेत.सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या अशासकीय समितीवर महिला अध्यक्ष म्हणून १५ वर्षांपासुन कार्यरत असुन जिल्हा रुग्णालयाच्या समितीवर २० वर्षांपासून अशासकीय सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.पक्ष पातळीवरही अ.भा.कॉ कमिटी नवी दिल्लीच्या पंचायत राज समितीच्या जिल्हाध्यक्षा म्हणून ७ वर्ष त्यांनी काम पहिले.तर काँग्रेस शहर विशेष निमंत्रक महिला म्हणूनही त्या कार्यरत आहेत.याव्यतिरिक्त आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून निराधार व वयोवृद्ध महिलांसाठीही शिल्पाताई कार्यरत असून महिला बचत गटांना मार्गदर्शन तसेच महिलांच्या सक्षमीकारणासाठी मार्गदर्शन श्रीमती दुसुंगे करतात. 

पक्षानं माझ्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी आजपर्यंत मी नेटाने पार  पाडली असून पक्ष मजबूत होण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा उंच होण्यासाठी जेजे काही करणे आवश्यक आहे तेते सर्व मी करते.हि नवीन जबाबदारी स्वीकारतांनाही काँग्रेस पासून दूर गेलेले कार्यकर्ते पक्षाकडे परत वळवून तसेच पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्याचा व तळागाळापासुन पक्ष मजबूत करून एकसंध करण्यासाठी चे उपक्रम राबविणार असल्याचे शिल्पाताई दुसुंगे यांनी सांगितले.       

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य के.सी.वेणुगोपालजी,ठाकूर विपिनसिंह राजवत (संस्थापक,अध्यक्ष आय.सी.बी),श्रीमंती नुरेशा तिर्की  (राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष) ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले,प्रदेशअध्यक्ष काँग्रेस ब्रिगेड रेवणनाथ देशमुख,प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष काँग्रेस ब्रिगेड चंद्रशेखर पाटील,काँग्रेस ब्रिगेडचे प्रदेश प्रभारी वाघमारे, महिला प्रदेशाध्यक्षा प्रेमाकिरण विजय भट ,सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षा विद्या कदम,कार्याध्यक्षा डांगे मॅडम आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिल्पाताई दुसुंगे यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

0 Comments