एस टी कर्मचाऱ्यांच्या शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल

एस टी कर्मचाऱ्यांच्या शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल 

वेब टीम मुंबई : विलीनीकरणाच्या  मागणी साठी संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा जमाव आज राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर चाल करून गेला या जमावाचे नेतृत्व कुणा एका कडे नसल्याने या जमावावर कोणाचेही नियंत्रण नव्हते.  त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने चालून आलेल्या जमावामुळे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या परिसरात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. 

गेले साडे पाच महिने चालू असलेल्या संपाच्या दरम्यान 125 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या प्रकरणाला शरद पवार अजित पवार यांना जबाबदार धरून जमाव घोषणाबाजी करत होता . काही महिलांनी यावेळी 125 आत्महत्या केलेल्या यांच्या नावाने बांगड्याही फोडल्या तर जमावातील काही आंदोलकांनी चपला आणि दगडांचा मारा शरद पवार यांच्या निवासस्थानी च्या दिशेने केला.  तेव्हा  मुंबई पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला.  पण जमाव एवढा मोठा मोठा होता की त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होते.  तेव्हा खासदार सुप्रिया सुळे त्यांनी गर्दीला सामोरे जात शांततेच  आवाहन केले.  त्यांनाही गर्दीने जुमानले नाही घोषणाबाजी सुरू होती . अखेर सुप्रिया सुळेंनी तुम्ही शांत पणे चर्चा  करणार असाल तरच मी या क्षणी चर्चा करायला तयार आहे.  फक्त मला एकदा आई-वडील आणि माझी मुलगी आत आहे त्यांची विचारपूस करून येऊ द्या असे म्हणून पोलीस गराड्यात पवार यांच्या निवासस्थानी गेल्या. 

 या मोर्चामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक सिल्वर ओक  जवळ पोहोचलेच कसे?  या मोर्चाचे नेतृत्व नेमके कोणी केले ?त्या सर्व कर्मचाऱ्यांना येथे येण्यामागे कोणाची फूस  आहे का?  आणि या सर्व प्रकाराची पोलिस विभागाच्या गुप्तचर खात्याला कुणकूण लागली नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व त्यांचे समर्थक आणि इतर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले दोन्ही बाजूने घोषणायुद्ध सुरु होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांना पांगवले आणि काही आंदोलकांना अटक केल्याने पुढील अनर्थ टळला. 

Post a Comment

0 Comments