बेवारस बॅग सापडल्याने अहमदनगरमध्ये खळबळ
वेब टीम नगर : अहमदनगर शहरातील नगर पुणे रोड वरील अरुणोदय हॉस्पिटल समोर एका टपरीवर बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली असून आराध्य टी सेंटरवर ही बेवारस बॅग आढळून आली असून याबाबतची तपासणी सध्या बॉम्बशोध पथक करत आहे.
नगर पुणे रोड वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आला आहे बॅग सापडल्याने आणि बॉम्बशोधक पथक तेथे आल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी ही गर्दी पांगली असून या बॅगेमध्ये नेमक काय आहे याचा तपास आता बॉम्बशोध पथक घेत आहे तसेच आसपास सीसीटीव्ही फुटेज आहे ताब्यात घेण्याची सुरुवात पोलिसांनी केली असून नेमकं या बागेत काय आहे हे आता तपासणी तर समोर येईल.
दरम्यान हि बेवारस लेदर बॅग पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे यारस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे तपास कार्यात अडथळा निर्माण होत होता . पोलिसांची अर्धी अधिक सक्ती वाहतूक सुरळीत करण्यात खर्ची पडत होती.
0 Comments