संगमनेरात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

संगमनेरात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास 

वेब टीम संगमनेर :  संगमनेर शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील एका ठिकाणी घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल सव्वा चार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.

याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील स्वदेश हॉटेलमागे अनिल दिनकर काळे हे राहतात.

दि. 19 मार्च रोजी घरी कुणीही नसल्याने चोरट्यांनी दोन पिक अप वाहनातून येऊन घराचे गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्या- चांदीचा असा एकूण 4 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

याबाबत अनिल दिनकर काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन काशीनाथ रोकडे (रा. बालाजीनगर, संगमनेर), अशोक बडे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments