उत्तर प्रदेश जिंकणं भाजपासाठी सोपं नाही : प्रवीण तोगडियांचा

उत्तर प्रदेश जिंकणं भाजपासाठी सोपं नाही : प्रवीण तोगडियांचा

भारताने बचावकार्यात उशीर केल्यामुळेच एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमावला लागला 

वेब टीम नागपूर : १० मार्च रोजी जाहीर होणाऱ्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातही उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल की समाजवादी पक्षाची सत्ता स्थापन करेल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्या मते उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाला नुकसान सहन करावे लागणार आहे. उत्तर प्रदेश जिंकणं भाजपासाठी सोपं नाही, असा इशारा त्यांनी भाजपाला दिला आहे. तोगडिया नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या निवडणुकीत भाजपाला कोणत्या कारणांमुळे फटका बसेल, याबद्दल बोलताना तोगडिया म्हणाले की, “शेतकरी आंदोलना सोबतच, कृषी उत्पादनाला हमी भाव दिला नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत, याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.” यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल भाष्य केलं.  

“युक्रेन-रशिया युद्धात भारताने तटस्थ राहण्याची भूमिका योग्यच आहे. युक्रेन मधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम १५ फेब्रुवारीला सुरू करण्याची आवश्यकता होती, मात्र भारताने उशीर केल्यामुळेच एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमावला लागला आहे, असे तोगडिया म्हणाले. युक्रेन मध्ये उणे १० डिग्री तापमानात विद्यार्थी शेकडो किलोमीटर पायी चालत आहे, हे निंदनीय असून विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी मंत्र्यांनी तिथे जाऊन यंत्रणा राबवावी,” अशी मागणी प्रवीण तोगडिया यांनी केली.

Post a Comment

0 Comments