महिलांच्या कपड्यांमुळेच बलात्काराचं प्रमाण वाढतंय
कर्नाटकच्या भाजपा आमदारांचं वादग्रस्त विधान
वेब टीम बंगळुरू : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे प्रतिसाद देशभर उमटू लागले आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी प्रतिक्रिया देत “बिकिनी असो, घुंगट असो, जीन्स किंवा हिजाब असो, आपण काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा,” असं म्हटलं होतं. यावर कर्नाटकच्या भाजपा आमदारांनी प्रतिक्रिया देत महिलांच्या कपड्यांमुळेच बलात्कारांचं प्रमाण वाढल्याचं वक्तव्य केलंय.
प्रियंका गांधी यांच्या ट्वीटला उत्तर देत रेणुकाचार्य म्हणाले: “‘बिकिनी’ सारखा शब्द वापरणे, हे खालच्या दर्जाचे विधान आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना मुलांनी पूर्ण कपडे घातले पाहिजेत. आज महिलांच्या कपड्यांमुळे पुरुष भडकतात म्हणून बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. हे योग्य नाही. आपल्या देशात
दरम्यान, रेणुकाचार्य यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आधीच हिजाब प्रकरणावरून कर्नाटकचं राजकारण तापलं असून त्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी महिलांच्या कपड्यांमुळे बलात्काराचं प्रमाण वाढत असल्याचं म्हटलंय.
0 Comments