आनंद सुब्रमण्यन याला सीबीआयकडून अटक

आनंद सुब्रमण्यन याला सीबीआयकडून अटक

तपासात सहकार्य करत नसल्याने कारवाई

एनएसईसह अनेक तज्ज्ञांच्या मते हा अज्ञात योगी दुसरा कोणी नसून अटक झालेले सल्लागारच आहेत

वेब टीम नवी मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) मध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या गोंधळाच्या प्रकरणी सीबीआयने आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ही माहिती दिली. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आनंद सुब्रम्हण्यम हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. सुब्रम्हण्यम यांना चेन्नईतून सीबीआयने अटक केली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.



एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आनंद सुब्रमण्यम यांचीही चौकशी करत होती. ते तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत होते. सीबीआय अज्ञात योगी आणि चित्रा यांच्यात इमेलवर झालेल्या संभाषणाची अधिक माहिती घेत होती, पण आनंद त्याबद्दल नीट सांगत नव्हते.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एनएसईसह अनेक तज्ज्ञांच्या मते हा अज्ञात योगी दुसरा कोणी नसून आनंद हेच आहेत. सेबीला सादर केलेल्या निवेदनात, एनएसईने म्हटले होते की आनंद खरोखर योगी आहे आणि तो बनावट ओळख निर्माण करून चित्रा यांच्याकडून माहिती घेत होता. मात्र, सेबीने एनएसईचा हा मुद्दा मान्य केला नाही

एनएसई को – लोकेशन घोटाळ्यात निवडक ब्रोकर्सना फायदा करुन देण्यात आला होता. ओपीजी सिक्युरिटीज नावाच्या ब्रोकरेज फर्मला फायदा मिळवून देण्यासाठी त्याला को-लोकेशन सुविधांमध्ये प्रवेश देण्यात आल्याचे त्याच्या तपासातून समोर आले आहे. या सुविधेत उपस्थित ब्रोकर्सना बाकीच्यांपेक्षा लवकर सर्व माहिती मिळत होती. अशा प्रकारे एनएसईवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सीबीआयचे मत आहे. हा घोटाळा त्याच वेळी सुरू झाला जेव्हा चित्रा यांना बढती मिळून त्या सर्वोच्च पदाव पोहोचणार होत्या. चित्रा मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर आणि आनंद त्यांचा जवळचा सहकारी बनल्यानंतर घोटाळा सुरूच होता. या प्रकरणात, सीबीआय त्या अज्ञात योगीचे कनेक्शन शोधत आहे, ज्याच्या इशार्‍यावर चित्रा या एनएसईचे सर्व निर्णय घेत होत्या.

Post a Comment

0 Comments