अल्पवयीन मुलींना कारमधून पळविले आणि ......

अल्पवयीन मुलींना पळविले आणि ...... 

वेब टीम शेवगाव : जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागला आहे. यातच शेवगाव  तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय.शेवगाव-नेवासा रोडवर वरून जाणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना (वय 10 वर्षे व 13 वर्षे) कारमधून पळवून घेऊन जात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी एकावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कार्तीक राजेंद्र काळे ( 20, रा. आयशानगर, शेवगाव) याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईकांनीच मुलींची सुटका केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या दोन्ही मुलींचे आरोपीने अपहरण कशासाठी केले, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.


Post a Comment

0 Comments