शहरासह जिल्ह्यातही शिवजयंती उत्साहात

शहरासह जिल्ह्यातही शिवजयंती उत्साहात  

वेब टीम नगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. शहरात जिल्हाधिकारी ,आमदार यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने सकाळी  एसटी स्थानकाकाजवळच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शहर फडकणाऱ्या भगव्या झेंड्यामुळे भगवेमय झाल्याचे पाहायला मिळाले.  आज राज्यभर मोठ्या उत्साहात हि जयंती साजरी होत आहे.

शहरात चौका चौकात  शिवप्रतिमेची स्थापना करण्यात आली होती . जागोजागी पोवाड्यांच्या गायनाने तरुणाई मध्ये स्फूर्तीचे बवातावरण होते. यावेळी नगर ते औरंगाबाद सायकल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतही सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला . 

 शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक स्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

दरम्यान दरवर्षी शिवजयंती निमित्ताने विनोद पाटील यांच्या सौजन्याने हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील व शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाते.या वर्षीही दोन दिवस ही ऐतिहासिक पुष्पवृष्टी केली जाणार असून शुक्रवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला निमगावच्या शिवस्मारक स्थळावर असलेल्या शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

 आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सकाळी शिव पालखी मिरवणूक, शिव छत्रपती शिवाजी महाराज आरती, शेख सुभानअली मुंबई यांचे शिवचरित्रावर व्याख्यान, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित शिवभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments