धोक्याची घंटा ! अतिरेक्यांनी शिर्डीत केली रेकी
वेब टीम राहाता : जगविख्यात असलेलं नगर जिल्ह्यातील शिर्डी हे देवस्थान येथे जगभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात. आता नुकतेच या देवस्थानाबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानी आतंकवादी संघटनेच्या माध्यमातून दुबईवरून आलेल्या आरोपींंनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली गुजरात एटीएसला दिली आहे.
त्यामुळे सदरील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र एटीएस बरोबरच साई संस्थानची तसेच अतिरिक्त पोलीस यंत्रणेपुढे आव्हान असणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींकडून शिर्डी येथील मूळचे रहिवासी व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास असणारे एका हिंदी चॅनेलचे संपादक यांच्या दिल्ली येथील कार्यालय व शिर्डी येथील त्यांच्या घरी रेकी केल्याची कबुली दिली आहे.
या घटनेनंतर शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. दुबई येथील अटक केलेल्या आरोपी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी सुरेश चव्हाणके यांच्या मुळगाव शिर्डी येथील घराची रेकी केली आहे.या आरोपींंकडे अवैध हत्यार, विस्फोटक पदार्थ, तसेच गोळा बारुद मिळून आले आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत सहा मौलवीसह दोन असे आठ जणांना अटक करण्यात आली असून दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शिर्डीसारख्या अती संवेदनशील ठिकाणी आतंकवादी संघटनेचे लोक येऊन रेकी करून जातात याबाबत पोलीस यंत्रणेला काही कळत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
0 Comments