स्टुडिओ परत करा अन्यथा......

स्टुडिओ परत करा अन्यथा......

जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याकरिता कोल्हापुरकर आक्रमक ; खरेदीदारांच्या कार्यालयावर शाई फेकून निषेध!

वेब टीम कोल्हापूर : कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणी वाढत असताना, या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केलेली असल्याचे समोर आल्याने, आता प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. हा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर जयप्रभा स्टुडिओ खरेदीदार रौनक शहा गुंदेशा आणि पोपट शहा गुंदेशा यांच्या कार्यालयावर आज(रविवार) शाई फेकून जाहीर निषेध नोंदवला गेला. तसेच, लवकरात लवकर जयप्रभा स्टुडिओ परत करावा अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान,पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

तर, दुसरीकडे जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी आजपासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. तसेच, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीनेही स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही केली आहे.

Post a Comment

0 Comments