शिर्डी देवस्थानच्या दानपेटीत जुन्या नोटांची आवक

शिर्डी देवस्थानच्या दानपेटीत जुन्या नोटांची आवक 

वेब टीम शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदी करून आता पाच वर्षे झाली असली तरी, जुन्या नोटा अजूनही आढळून येत आहेत. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या तिजोरीत सोने-चांदी, हिरे व बहुमोल रत्नांबरोबरच तब्बल तीन कोटींच्या पाचशे व हजार रूपयांच्या बंद करण्यात आलेल्या जुन्या नोटा आढळून आल्या आहेत़. नोटबंदीला पाच वर्षे उलटले तरी आजही दानपेटीतील या जुन्या नोटांची आवक थांबलेली नाही़.

 भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या या जुन्या नोटांचे मुल्य रद्दीतील कागदा इतकच असलं तरी, या नोटा जवळ बाळगणे किंवा त्यांचा संग्रह करणे बेकायदेशीर आहे़. यामुळे अद्यापही दानपेटीत पडणाऱ्या या नोटांनी साई संस्थानची डोकेदूखी वाढवली आहे़. यासाठी केंद्रीय पातळीवर अनेकदा पाठपूरावा करण्यात आला असला तरी, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही़.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली़ त्यानंतर 31 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा राष्ट्रीयकृत बँकामध्ये स्विकारण्यात आल्या किंवा बदलून देण्यात आल्या़. या काळात साई संस्थानने रोजच्या रोज दानपेट्या उघडून पैशांची मोजदाद केली व जुन्या नोटा तातडीने बँकेत जमा केल्या़. 31 डिसेंबरनंतर बंद करण्यात आलेल्या जुन्या नोटा स्विकारणे बंद झाले़. मात्र, दानपेटीत अजुनही कमी अधीक प्रमाणात या नोटा आढळतात़. अन्य देवस्थानांच्या बाबतीतही अशीच परिस्थीती असण्याची शक्यता आहे़.

 आरबीआयने नोंदणीकृत देवस्थानांच्या दानपेटीत आलेल्या जुन्या नोटा जमा करून घेण्याची आवश्यकता आहे़. धर्मादाय आयुक्तांच्या उपस्थितीत दानपेट्या उघडून मोजदाद करण्याचा नियम आहे़. सध्याच्या चलनातील इतर नोटा राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येतात़. जुन्या नोटा निघाल्यानंतर त्याची स्वतंत्र नोंद ठेवून त्यावर धर्मादाय आयुक्तांच्या प्रतिनीधींची स्वाक्षरी घेतली जाते़. यानंतर त्या तिजोरीत ठेवण्यात येतात़. आजवर संस्थानच्या तिजोरीत साचलेल्या बंद नोटांचा आकडा तीन कोटी पाच लाखांवर पोहचला आहे़. याबाबत साई संस्थानचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे़. आम्ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवले होते़. त्यांनी रिझर्व्ह बँकेला याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत़. आम्हीही रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात असून लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी वक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments